ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांमुळे ‘मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन’ म्हणजेच ‘एमएफए’चा वापर जगात मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. याच एमएफए वापरण्याच्या बाबतीत भारत जगात टॉपवर पोहोचला आहे, नुकतीच अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे.

एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सचा भाग असलेल्या ४५१ रिसर्चने आयोजित केलेल्या थेल्सच्या अहवालात असे आढळून आले आहे की, सर्वेक्षण केलेल्या सर्व देशांमधून भारतीयांमध्ये एमएफए दत्तक घेण्याची सर्वाधिक टक्केवारी आणि एमएफए वापराच्या सर्वाधिक टक्केवारीत मोठी वाढ झाली आहे.

संशोधन एजन्सी थेल्सच्या म्हणण्यानुसार, यावर्षी भारतात एमएफएचा वापर १९ टक्क्यांनी वाढला असून, येथे सर्वाधिक ६६ टक्के लोक याचा वापर करत आहेत. तर जगात याचा वापर ५६ टक्के लोक करत आहेत. दुस-या स्थानावर सिंगापूर असून येथे १७ टक्के वाढीसह ६४ टक्के लोक एमएफएचा वापर करत आहेत.

आणखी वाचा : दणकट बॅटरी अन् पॉवरफुल प्रोसेसरसह लेनोव्हाचा टॅबलेट बाजारात!

थेल्सच्या अहवालानुसार, जगभरातील ६८ टक्के एमएफए रिमोट वर्कर्स वापरतात. २०२१ मध्ये गैर-आयटी कर्मचा-यांमध्ये एमएफएचा कल ३४ टक्के होता, जो यावर्षी ४० टक्के झाला आहे. जगभरातील ८४ टक्के आयटी व्यावसायिकांनी रिमोट वर्कला सुरक्षित आणि सोपे करण्यासाठी त्यांच्या सुरक्षा प्रणालीवर विश्वास ठेवला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमएफए हे विशेष प्रकारचे सुरक्षा तंत्रज्ञान

एमएफए हे विशेष प्रकारचे सुरक्षा तंत्रज्ञान आहे. यामध्ये खाते लाॅग इन करण्यासाठी किंवा ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी क्रेडेन्शियल्सची पडताळणी करण्यासाठी अनेक पाय-या आणि पद्धतीचा समावेश आहे.

पासवर्ड सहजपणे क्रॅक होत नाही

मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशनचे वैशिष्ट्ये म्हणजे यामुळे पासवर्ड सहजपणे क्रॅक होत नाही. त्यामुळे एफएफए हे वैशिष्ट्य आपल्या बॅंकिंग अॅप्समध्ये वापरले पाहिजे. या फीचरमध्ये यूजरला लाॅग इन करण्यासाठी पासवर्डही फिंगरप्रिंट स्कॅनर, ओटीपी, डेबिट कार्ड नबंर अशा अनेक गोष्टींची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत, बहु- स्तर सहजपणे तोडता येत नाही.