Infosys ही एक लोकप्रिय टेक कंपनी आहे. या कंपनीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. इन्फोसिसचे अध्यक्ष मोहित जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मोहित जोशी गेल्या २२ वर्षांपासून इन्फोसिस कंपनीमध्ये काम करत होते. मोठी जोशी हे जून २०२३ पर्यंतच इन्फोसिसमध्ये काम करतील. मोहित जोशी आता Tech Mahindra कंपनीमध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि CEO असणार आहेत.

कंपनीने दिली ही माहिती

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये इन्फोसिसने दिलेल्या माहितीनुसार मोहित जोशी यांचा राजीनामा ११ मार्च २०२३ पासून सुट्टीवर असणार आहेत. त्यांचा कंपनीतील शेवटचा दिवस हा ९ जून २०२३ असणार आहे. मोहित जोशी यांनी कंपनीसाठी केलेल्या कामाबद्दल संचालक मंडळाने जोशी यांचे कौतुक केले.

हेही वाचा : Reliance Jio ने लॉन्च केली आणखी २७ शहरांमध्ये ५ जी सेवा; महाराष्ट्रातील ‘या’ शहरांचा आहे समावेश

टेक महिंद्रा कंपनीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सांगितले की मोहित जोशी यांना २० डिसेंबर २०२३ पासून कंपनीच्या संचालक मंडळावर घेतले जाईल. मोहित जोशी १९ डिसेंबर २०२३ पासून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारतील. व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून पाच वर्षांसाठी त्यांची नियुक्ती केली जाईल. मोहित जोशी यांनी इन्फोसिसच्या आधी ABN Ambro, ANZ Grindlays या कंपनीमध्ये काम केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहित जोशी यांनी २००० सालामध्ये इन्फोसिसमध्ये काम सुरु केले होते. या आधी ते युरोपमधील आर्थिक व्यवसायांचे नेतृत्व करत होते. २००७ मध्ये मोहित याना इन्फोसिस मेक्सिकोचे सीईओ म्हणून घोषित करण्यात आले होते. मोहित यांनी लॅटिन अमेरिकेमध्ये इन्फोसिसचे पहिली उपकंपनी स्थापन केली होती.