Intel ही एक अमेरिकन टेक्नॉलॉजी कंपनी आहे. कॉम्पुटरचे सेइमीकंडक्टर चिप तयार करणाऱ्या मोठ्या कंपन्यांपैकी ही एक मोठी कंपनी आहे. इंटेल कंपनीच्या भारतातील म्हणजेच इंटेल इंडियाच्या प्रमुख निवृत्ती राय यांनी तब्बल २९ वर्षांच्या आपल्या प्रभावी कार्यकाळानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. निवृत्ती राय यांनी राजीनामा दिल्याचे इंटेलने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवृत्ती राय यांनी फेब्रुवारी १९९४ मध्ये डिझाईन इंजिनिअर म्हणून इंटेल कंपनीमध्ये आपल्या कामाला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी इंटेल इंडियाचे हेड आणि आणि इंटेल फाउंड्री सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष या पदांवर काम केले. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

हेही वाचा : Layoff News: Recruiting टीम मध्येच होणार कपात; ‘ही’ कंपनी २०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

निवृत्ती राय यांच्या नेतृत्वाखाली इंटेल इंडियाने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीबद्दल इंटेलने प्रसिद्ध केलेल्या आपल्या निवेदनामध्ये राय यांचे कौतुक केले आहे. तसेच त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन, महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या त्यांच्या असामान्य कार्याबद्दल निवृत्ती राय यांना २०२२ मध्ये नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

निवृत्ती राय यांनी सुरुवातीच्या काळामध्ये १९९४ ते २००५ या कालावधीमध्ये अमेरिकेतील इंटेलमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी चिपसेट इंजिनिअरिंग आणि intellectual प्रॉपर्टी डेव्हलपमेंट संचालक पदाचा कार्यभार स्वीकारून त्या बंगळुरू येथे कार्यरत होत्या. अमेरिकेच्या बाहेर इंटेलच्या सर्वात मोठे इंजिनिअरिंग केंद्र म्हणून कंपनी इंटेल इंडियासाठी नेतृत्व उत्तराधिकार योजनेसंदर्भात पुढील अपडेट देण्याची योजना आखत आहे.

हेही वाचा : Airtel ने लॉन्च केला ३५ दिवसांच्या वैधतेसह ‘हा’ प्रीपेड प्लॅन, Wynk Music मध्ये मोफत प्रवेश मिळणार

इंटेलने आपल्या निवेदनात म्हटले, ” इंटेल इंडियाचे कंट्री हेड आणि टेल फाउंड्री सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष निवृत्ती राय २९ वर्षांनी इंटेल कंपनी सोडत आहेत. इंटेल इंडियाने त्यांच्या नेतृत्वामध्ये प्रचंड प्रगती केल्याबद्दल आम्ही निवृत्ती यांचे आभारी आहोत. आज इंटेल इंडिया अमेरिकेबाहेरील आमची सर्वात मोठी इंजिनिअरिंग साईट आहे कंपनीसाठी एक महत्वाचा भाग आहे. निवृत्ती राय यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.”

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Intel india head nivrutti rai resign after 29 years honored with the nari shakti puraskar in 2022 check details tmb 01
First published on: 23-06-2023 at 11:23 IST