गेल्या महिन्यात अ‍ॅपल कंपनीने आयफोन १५ सिरीज लॉन्च झाली आहे. या सिरीजमध्ये आयफोन १५ , आयफोन १५ प्लस , आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. आयफोन १५ सिरीज लॉन्च झाल्यानंतर आयफोन १३ हा कंपनीचा सर्वात स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. आयफोन १३ लॉन्च झाल्यानंतर या फोनला खरेदीदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. तसेच मागील वर्षी झालेल्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये सर्वाधिक विक्री होणार फोन होता. आयफोन १३ हा फोन २०२१ मध्ये ७९,९०० रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. खरेदीदारांना आयफोन १३ फ्लिपकार्टवर स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. आयफोन १३ स्वस्तात कसा खरेदी करता येईल ते जाणून घेऊयात.

iPhone 13 : फीचर्स

जर का तुम्ही एक प्रीमियम फ्लॅगशिप लेव्हलचे डिव्हाइस खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल आणि तुमचे योग्य असे बजेट असेल तर तुमच्यासाठी आयफोन १३ हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये वापरकर्त्यांना ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळतो. तसेच या फोनला A15 बायोनिक चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे.  याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

हेही वाचा : VIDEO: भारतात लवकरच OnePlus लॉन्च करणार आपला ‘हा’ पहिला फोल्डेबल स्मार्टफोन, टिझर एकदा पाहाच

आयफोन १३ मध्ये ४ के डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंगसह १२ मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. तसेच नाइट मोडसह १२ मेगापिक्सलचा ट्रू डेप्थ फ्रंट कॅमेरा देखील मिळतो. हा फोन १७ तासांचा व्हिडीओ प्लेबॅक ऑफर करतो असा कंपनीचा दावा आहे. अगदी कमी किंमतीमध्ये जवळजवळ आयफोन १४ प्रमाणेच स्पेसिफिकेशन्स ऑफर करतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे ऑफर ?

Apple कंपनी आयफोन १३ ची आपल्या अधिकृत स्टोअरवरून ५९,९०० रुपयांमध्ये विक्री करत आहे. तसेच आयफोन १३ वर फ्लिपकार्टवर २५,६०० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे खरेदीदारांना हा फोन फ्लिपकार्टवरून केवळ २६,३९९ रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळू शकते. आयफोन १३ हा फोन फ्लिपकार्टवर ७,९०१ रुपयांच्या डिस्काउंटनंतर ५१,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. तसेच खरेदीदारांनी आयसीआयसीआय आणि अ‍ॅक्सिक्स व सिटी बँकेच्या खरेदी कार्डने व्यवहार केले असता त्यांना १ सूट देखील मिळू शकते. यामुळे आयफोन १३ ची किंमत ५०,९९९ रुपयांपर्यंत कमी होते. त्याशिवाय खरेदीदार जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात २४,६०० रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळवू शकता. सर्व डिस्काउंट ऑफर्स आणि बँक ऑफर्ससह खरेदीदार आयफोन १३ हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर केवळ २६,३९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.