iPhone हा फोन सर्वांचा आवडता फोन आहे. Apple कंपनी आयफोनच्या नवनवीन सिरीज ग्राहकांसाठी लॉन्च करतच असते. तसेच प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्याकडे देखील आयफोन असावा. सध्या आयफोन सिरीजमधील iPhone 13 च्या किंमतीमध्ये भारतामध्ये थोडी घट झालेली पाहायला मिळत आहे. ई-कॉमर्स साईट Flipkart वर किंमतीमध्ये घट झालेली दिसत आहे. तर फ्लिपकार्टवर ग्राहक, खरेदीदार आयफोन १३ किती रुपयांना खरेदी करू शकतात हे जाणून घेऊयात.

iPhone 13 हा ५ जी फोन फ्लिपकार्टवर कमी किंमतीमध्ये लिस्ट झाला आहे. हा फोन खरेदी करण्यास उत्सुक असलेले ग्राहक ठरावीक बँकेच्या कार्डवरून हा फोन ५८,७४९ रुपयांमध्ये कमी किंमतमध्ये खरेदी करू शकतात. तसेच इथे ग्राहकांना एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळणार आहे. ज्यामुळे किंमतीमध्ये अजून फरक पडू शकतो. ते कसे ते पाहुयात. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

job opportunity in indian coast guard
नोकरीची संधी : इंडियन कोस्ट गार्डमधील संधी
Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
Viral video IndiGo air hostess heartwarming surprise for brother who joined same airline melts hearts
भावाला इंडिगोमध्ये नोकरी मिळाली, एअरहोस्टेस बहिणीने दिले सरप्राईज, हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकले नेटकऱ्यांचे मन
Leica working On Leica look For Xiaomi 14 series for smartphones iconic camera
‘या’ कंपनीच्या स्मार्टफोन्समध्ये दिला जाणार Leica चा आयकॉनिक कॅमेरा; पाहा काय असणार खास

हेही वाचा : OnePlus ने लॉन्च केला १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला’ ‘हा’ तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमत एकदा पहाच

iPhone 13 सध्या फ्लिपकार्टवर १२८ जीबी स्टोरेज असणारा व्हेरिएंट ५८,७४९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीपासून उपलब्ध आहे. Apple च्या ऑनलाईन स्टोअरवर हा आयफोन १३ ६९,९०० रुपयांना विकला जात आहे. म्हणजेच ग्राहकांना ११,१५१ रुपयांची सूट मिळत आहे. यामध्ये कोणतीही अति किंवा नियम नसणार आहेत.

ज्या ग्राहकांकडे SBI बँकेचे क्रेडिट कार्ड आहे ते हा ५जी आयफोन १३ ५७,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतील. कारण फ्लिपकार्ट या कार्डवरून खरेदी केल्यास १० टक्के (७५० रुपये) सूट देत आहे. तसेच यामध्ये ३० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. ज्यामुळे कोणीही आयफोन १३ अगदी कमी किंमतीमध्ये करू शकतील. तुमच्याकडे सध्या असलेला फोन आणि तो किती वर्षांपूर्वी किती खरेदी केला आहे याच्यावर एक्सचेंज ऑफरची किंमत ठरत असते.

सध्या फ्लिपकार्टवर सुरू असलेली ही आयफोन १३ वरील ऑफर मर्यादित कालावधीची आहे की जास्त कालावधीची याबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र सध्या आयफोन १३ कमी किंमतीत खरेदी करण्याची ग्राहकांना चांगली संधी आहे.