OnePlus ही एक मोबाइल उत्पादक कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करत असते. वनप्लसने आतासुद्धा आपला OnePlus Nord N30 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनला नुकत्याच अनेक सर्टिफिकेशन साईटवर पाहिले गेले होते. या फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबद्दल जाणून घेऊयात. Nord N30 चे फीचर्स कंपनीने लॉन्च केलेल्या Nord N30 या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोअर Qualcomm Snapdragon 695 SoC प्रोसेसर देण्यात आले आहे. तसेच या फोनमध्ये वापरकर्त्यांना ६.७२ इंचाचा फुलएचडी + LCD डिस्प्ले मिळणार आहे. या स्क्रीनचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. तर टच सॅम्पलिंग रेट २४० Hz इतका आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो २०:९ आहे. स्क्रीन sRGB, डिस्प्ले P3 आणि डार्क मोडला सपोर्ट करते. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे. हेही वाचा : Realme 11 Pro+ 5G vs Samsung Galaxy F54: जबरदस्त कॅमेरा,बॅटरी अन् डिस्प्लेमध्ये कोणता आहे बेस्ट स्मार्टफोन; जाणून घ्या फीचर्स आणि.. वनप्लसच्या या फोनमध्ये तुम्हाला ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU देण्यात आले आहे. तसेच फोनमध्ये ८जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड १३ बेस OxygenOS 13 सह येतो. तसेच फोटोग्राफीसाठी यामध्ये १०८ मेगापिक्सलचा Samsung S5KHM6SX03 चा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर असलेले ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Nord N30 5G मध्ये वापरकर्त्यांना सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे. हा कॅमेरा डिस्प्लेवरील पंच हॉलमध्ये दिला आहे. तसेच या फोनमध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून, ५० W चे SuperVOOC वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. तसेच सेफ्टीसाठी स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हेही वाचा : Reliance Jio ने एकाच वेळी लॉन्च केले ५ प्रीपेड प्लॅन्स, बरोबर मिळतेय ‘या’ अॅपचे सबस्क्रिप्शन काय असणार किंमत OnePlus Nord N30 5G हा स्मार्टफोन केवळ ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज या एकाच व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याची किंमत $२९९.९९ (अंदाजे २४,८०० रुपये) इतकी आहे. हा फोन केवळ Chromatic Grey या रंगामध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन सध्या अमेरिकेमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. लवकरच तो सर्वत्र लॉन्च होण्याची शक्यता आहे. हा फोन ग्राहक सध्या अमेरिकेच्या साईटवर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे.