scorecardresearch

iPhone 14 वर मिळतोय ‘इतक्या’ हजारांचा भरघोस डिस्काउंट; Flipkart वरुन करा लवकरात लवकर खरेदी

आयफोन 14 गेल्या वर्षी भारतामध्ये लॉन्च झाला होता.

iphone 14 15000 discount on flipkart
iPhone 14 वर मिळतोय १५,००० रुपयांचा डिस्काउंट (image credit- loksatta)

Flipkart या ई-कॉमर्स साईटवर्ती Apple च्या iPhone 14 वरती मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे. हा आयफोन फ्लॅगशिप फोन असलेल्या आयफोन १३ च्या किंमतीमध्ये मिळत आहे. नवीन डिस्काउंट ऑफरसह, या दोन आयफोनमधील फरक फक्त ३,००० रुपयांचा आहे. फ्लिपकार्ट आयफोन १४ वरती १५,००० रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. चला तर या आयफोनवर कोणकोणत्या ऑफर्स आहेत ते जाणून घेऊयात.

iPhone 14 वरील ऑफर्स

आयफोन 14 सध्या फ्लिपकार्टवरती ६८,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. ज्याची मूळ किंमत ही ७९,९९९ रुपये आहे. म्हणजेच फ्लिपकार्टने आयफोनवर ११,००० रुपयांची सवलत दिली आहे. जर का तुम्ही हा फोन खरेदी करण्यासाठी HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्ही हा आयफोन १४ ६४,९९९ रुपयांच्या किंमतीमध्ये खरेदी करू शकता.

हेही वाचा : UPI चार्जेसबाबत NPCI ने दिले स्पष्टीकरण; म्हणाले, “बँक किंवा ग्राहकांना…”

या बँकेच्या कार्डवर ४००० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. ही ऑफर फक्त १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटसाठी उपलब्ध आहे. आयफोन १३ भारतात ६१,९९९ रुपयांपासून विकला जातो. Apple हाच iPhone आपल्या ऑनलाइन स्टोअरद्वारे ६९,९९९ रुपयांना विकत आहे. त्यामुळे ग्राहकांना या डिव्हाइसवर मोठ्या प्रमाणात सूटही मिळत आहे.

Flipkart iPhone 14 वर ३०,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे. तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असल्यास तुम्ही iPhone 14 ची किंमत आणखी कमी करू शकता. जर का तुम्ही या दोन्ही ऑफर्सचा फायदा घेण्यास यशस्वी झालात तर फोनची किंमत फक्त ३४,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

iPhone 14 चे फीचर्स

आयफोन 14 गेल्या वर्षी भारतामध्ये लॉन्च झाला होता. या लाइनअपमध्ये iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max यांचा समावेश होता. आयफोन 14 कॅमेरा त्याच्या मागील कॅमेरामध्ये फोटोनिक इंजिन समाविष्ट केल्यामुळे कमी प्रकाशात फोटोग्राफी करू शकतो. कंपनी लवकरच iPhone 15 सिरीज लॉन्च करू शकते. तुम्ही फ्लिपकार्ट वेबसाईटवर जाऊन iphone 14 purple हा फोन सर्च करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 09:51 IST

संबंधित बातम्या