Apple ची नवनिर्मिती म्हणजेच iPhone 14 विषयी सध्या एक खुशखबर समोर येत आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात iPhone 14 लाँच होण्याची शक्यता आहे. यापूर्वी काही महिने iPhone 14 चे नवनवे फीचर चर्चेत होते मात्र आता पहिल्यांदाच किंमतीविषयी रिपोर्ट्स समोर येत आहेत. टिप्सरने दिलेल्या माहितीनुसार, iPhone 14 ची सुरुवातीची किंमत $७९९ इतकी असू शकते, ही रक्कम iPhone 13 इतकीच आहे. किमंत कमी ठेवून ग्राहकांना आकर्षित करून देण्याचा प्रयत्न आहे असे Apple ने सांगितले आहे. हा निर्णय कंपनीच्या मुख्य कार्यकारी मंडळाकडून घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

दुसरीकडे, iPhone 14 Pro ची किंमत $1,099 म्हणजेच जवळपास ८७,१९१ रुपये आणि टॉप मॉडेल iPhone 14 Pro Max ची किंमत $1,199 म्हणजेच जवळपास ९५,१३१ रुपये असेल असा अंदाज आहे.

Apple iphone : ‘या’ देशात आयफोन विक्रीवर बंदी; कारण जाणून तुम्ही व्हाल हैराण

भारतीय iPhone युजर्सना कसा होणार फायदा?

Apple ने US प्रमाणेच भारतात सुद्धा मागील दोन वर्षात iPhone लाँच करताना बेस व्हेरियंटची किंमत वाढवलेली नव्हती. त्यामुळे iPhone 14 विकत घेताना ग्राहकांच्या खिशावर फार ताण येणार नाही. सध्या US मध्ये आयफोन 14 ची किंमत $799 आहे, जी रूपांतरित केल्यावर भारतात सुमारे ६३,२०० रुपये होते. परंतु, भारतात iPhone ची किंमत कदाचित इतकी कमी होणार नाही कारण जीएसटी आणि आयात शुल्क, इतर गोष्टींबरोबरच लागू होतील.

दरम्यान अशा प्रकारे किमंत न वाढवण्याची हि Apple ची पहिलीच वेळ नाही. जर यंदा समोर येणारी ही माहिती खरी ठरली तर iPhone ची किंमत न वाढवण्याचे हे सलग तिसरे वर्ष असणार आहे. २०१२ मध्ये iPhone 12 सुद्धा $७९९ च्या बेस्ट व्हेरियंट सह लाँच करण्यात आला होता जी समान रक्कम iPhone 13 च्या बाबतही कायम ठेवण्यात आली होती. आता समोर येत असणाऱ्या चर्चांनुसार iPhone 14 सुद्धा $७९९ किंवा अधिकाधिक १०० डॉलर अधिक म्हणजेच ८०,००० रुपयांपर्यंत लाँच केला जाईल अशी शक्यता आहे.

iPhone येत्या लाँच इव्हेंट मध्ये iPhone 14 Plus किंवा Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 चे iPhone 14 Pro Max हे मॉडेल्स घेऊन येणार आहे ज्या मध्ये मागील सीरिजच्या तुलनेत बरेच बदल पहायला मिळणार आहेत.