iPhone 17 series price in India and other countries: ९ सप्टेंबर रोजी अॅपलने नवीन आयफोन १७ सिरीज लाँच केली आहे. या सिरीजमध्ये iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max तसंच आतापर्यंतचा सर्वात स्लिम iPhone, iPhone 17 Air लाँच केला आहे. आयफोन १६च्या तुलनेत आयफोन १७ हा जास्त किमतीत सादर करण्यात आला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे, तर आयफोन १६च्या बेस व्हेरिएंटमध्ये १२८ जीबी स्टोरेज आहे.

iPhone 17 Seriesमधील सर्व मॉडेल्सची प्री-बुकिंग १२ सप्टेंबरपासून भारतात सुरू होणार आहे. हे मॉडेल्स १९ सप्टेंबरपासून ऑफलाइन आणि ऑनलाइन रिटेलर्सवर देशात खरेदीसाठी उपलब्ध करून दिले जातील.

अॅपलने लाँच केलेल्या या नव्या सिरीजमधील सर्वच मॉडेल्सच्या किमती वाढीव आहेत. स्टँडर्ड आयफोनची १७ची किंमत ८२ हजार ९०० रूपयांपासून सुरू होते, तर आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्सची किंमत अनुक्रमे १ लाख ३४ हजार ९०० आणि १ लाख ४९ हजार ९०० रूपयांपासून सुरू होते. हे सर्व जाणून घेतल्यानंतर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकेत या उत्पादनांची किंमत खूपच कमी आहे.

मॉडेल (किमती भारतीय चलनानुसार)भारतयूएसदुबई/यूएईयूकेव्हिएतनाम
iPhone 17८२,९०० रूपये७०,५०० रूपये८१,७०० रूपये८७,९०० रूपये१२८,८०० रूपये
iPhone Air११९,९०० रूपये८८,२०० रूपये१०३,३०० रूपये१०९,९०० रूपये१०५,४०० रूपये
iPhone 17 Pro१३४,९०० रूपये९७,००० रूपये११३,००० रूपये१२०,९०० रूपये११५,५०० रूपये
iPhone 17 Pro Max१४९,९०० रूपये१०५,८०० रूपये१२२,५०० रूपये१३१,९०० रूपये१२५,४०० रूपये
देशनिहाय आयफोन मॉडेल्सच्या किमती

कोणत्या देशात iPhone 17 Series सर्वात स्वस्त आहे?

वरील दाखवलेल्या फोटोप्रमाणे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले शुल्क असूनही नवीन iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max खरेदी करण्यासाठी अमेरिका हे सर्वात स्वस्त ठिकाण आहे. भारत आणि दुबईमध्ये या मॉडेल्सची किंमत जवळपास सारखीच आहे. मात्र, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max, iPhone 17 Airमधील किमतीतील फरक खूप मोठा आहे.

दुबईमधून खरेदी करताना तुम्ही iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Maxवर अनुक्रमे सहा हजारांची आणि २७ हजारांची बचत करू शकता.

यूकेचा क्रमांक सर्वात कमी किमतीच्या बाबतीत तिसरा आहे. बेस आयफोन १७ भारतापेक्षा व्हिएतनाममध्ये महाग आहे, मात्र iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max आणि iPhone 17 Air खरेदी करतानाही थोडीफार बचत नक्कीच होईल.