scorecardresearch

iQoo कंपनीचा ‘हा’ स्मार्टफोन भारतात झाला लाॅन्च; १० मिनिटांत होणार ५० टक्के चार्जिंग, जाणून घ्या

हा स्मार्टफोन तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर आणि Amazon India वर खरेदी करू शकणार आहात.

iQoo neo 7 5G launch in india news
iQoo neo 7 5G – प्रातिनिधिक छायाचित्र /द इंडियन एक्सप्रेस

iQ ही एक स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत असते. आज (१६ फेब्रुवारी ) आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. एका ऑनलाईन इव्हेंटमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला. या स्मार्टफोनमध्ये काय काय-खास गोष्टी आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.

iQoo Neo 7 5G चे फिचर्स

iQoo Neo 7 5G या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ६.७८ इंचाचा फुलएचडी प्लस AMOLED डिस्प्ले मिळतो. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो २०.९ आहे. तर तर रीफ्रेश रेट १२० Hz इतका आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राफिक्ससाठी octa-core 4nm MediaTek Dimensity 8200 5G हा प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये ८ जीबी अँड १२ जीबी रॅमचा पर्याय ग्राहकांना आहे. तसेच यामध्ये १२८ जीबी आणि २५६ जीबी हे इनबिल्ट स्टोरेज असलेले मॉडेल्स येतात. याची रॅम २० जीबी पर्यंत वाढवता येते.

iQoo Neo 7 5G या स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा , २ मेगापिक्सलमॅक्रोचा मॅक्रो व आणखी एक २ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर येतात. वापरकर्त्यांना १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा वापरायला मिळणार आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये ५००० mAh इतकी बॅटरी येते. १२० वॅटचे फ्लॅश चार्जिंग या स्मार्टफोनला सपोर्ट करते. १० मिनिटांत हा फोन ५० टक्के चार्ज होऊ शकतो असा कंपनीचा दावा आहे. या फोनचे वजन हे १९३ ग्रॅम इतके आहे.

हेही वाचा : Samsung चं टेन्शन वाढलं, Oppo चा दमदार FLIP फोन बाजारात, तब्बल ४ लाख वेळा…

iQoo Neo 7 5G ध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Wi-Fi, Bluetooth, OTG, NFC, GPS आणि USB Type-C पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.

किंमत

IQ Neo 7 5G हा स्मार्टफोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. या फोनची किंमत भारतात २९,९९९ रुपये इतकी आहे. तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ३३,९९९ रुपये इतकी आहे. तुम्ही हा फोन फ्रॉस्ट ब्लू आणि इंटरस्टेलर ब्लॅक या दोन रंगांमध्ये खरेदी करू शकणार आहेत. हा स्मार्टफोन तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर आणि Amazon India वर आजपासून (१६ फेब्रुवारी २०२३) खरेदी करू शकणार आहात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 17:52 IST
ताज्या बातम्या