iQoo कंपनीने काही दिवसांपूर्वी त्यांचा iQoo Neo 7 हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. आता हाच स्मार्टफोन भारतात लाँच करण्याचे संकेत कंपनीने दिले आहेत. या स्मार्टफोनमध्ये iQoo Neo 7, Neo 7 SE आणि Ne0 7 रेसिंग अशा सिरीजचा समावेश असणार आहे. हे आधी चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत.ट्विटरवर iQoo Neo 7 हा स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा चिनी कंपनी असणाऱ्या iQoo या कंपनीने केली. कंपनीने ट्विट मध्ये म्हटले की, आम्ही लवकरच भारतात आयक्यूओओ निओ ७ हा स्मार्टफोन फक्त Amazon India या वेबसाईटवर लाँच करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

GizmoChina च्या अहवालानुसार टिपस्टर मुकुल शर्मा यांनी सांगितले की, हा स्मार्टफोन फेब्रुवारी महिन्यात भारतामध्ये लाँच केला जाऊ शकतो. गेल्या वर्षी चीनमध्ये लाँच झालेल्या या स्मार्टफोनचा डिस्प्ले हा ६.७८ इंचाचा होता. तसेच यात एमओएलईडी स्क्रीन आहे. एचडी रिझोल्युशन आणि रिफ्रेश रेट १२०Hz इतका आहे.

हेही वाचा : Amazon Republic Day Sale: Alexa स्पीकरपासून किंडलपर्यंत मिळत आहे मोठी सूट; जाणून घ्या

याची रॅम १२ जीबी इतकी असू शकते. तसेच याचे इंटर्नल स्टोरेज हे २५६ जीबी आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा येतो. ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. यामध्ये ८ मेगापिक्सल अल्ट्रावाईड आणि २ मेगापिक्सल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. याच्या बॅटरीची क्षमता ५,०००mAh इतकी आहे. यामध्ये १२० वॅटचे चार्जिंग सपोर्ट येते. हा स्मार्टफोन ९ मिनिटात ५० टक्के चार्ज होऊ शकतो असा कंपनीचा दावा आहे.

काय असू शकते किंमत ?

या फोनचे बेस मॉडेलमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज येते. यांची किंमत अंदाजे ३०, ७६५ असू शकते. तर १२ जीबी रॅम नई ५१२ जीबी इन्टर्वल स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत अंदाजे ३७,००० रुपये असण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iqoo neo 7 smartphone of iqoo company will be launched in india and it has good features tmb 01
First published on: 16-01-2023 at 15:08 IST