Jio 11 months Recharge Plan Details : जिओ, एरटेल आणि व्हीआय या तिन्ही कंपन्या त्यांच्या ग्राहकांना स्वस्त आणि भरपूर फायदे देणारे रिचार्ज प्लॅन आणण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करत असतात. यामुळे ग्राहकांना फायदा होतो आणि त्यांना त्यांच्या गरजेनुसार रिचार्ज प्लॅन निवडण्यासाठी पर्याय मिळतो. तर आता भारतातील सर्वात मोठी दूरसंचार सेवा प्रदाता रिलायन्स जिओ पुन्हा एकदा ग्राहकांना खुश करण्याच्या तयारीत आहे.

जिओने सर्वात परवडणारे प्लॅन ग्राहकांसाठी ऑफर करणे सुरूच ठेवले आहे. आता आणखीन एक आनंदाची बातमी म्हणजे आता कंपनी ८९५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी घेऊन आली आहे; ज्यामध्ये ११ महिने अमर्यादित कॉलिंग आणि बऱ्याच खास सोयी असणार आहेत. सर्वात खास गोष्ट म्हणजे या रिचार्जची मासिक किंमत सरासरी फक्त ८० रुपये आहे, ज्यामुळे हा सर्वात स्वस्त कॉलिंग प्लॅन असणार आहे.

८९५ रुपयांच्या प्लॅनचे फायदे

जिओचा हा प्रीपेड प्लॅन ३३६ दिवस म्हणजे ११ महिन्यांची वैधता देतो. तसेच हा रिचार्ज प्लॅन केल्यावर तुम्ही देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा आनंद घेऊ शकता. पण, तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की, यात दरमहा ५० मोफत एसएमएस, २४ जीबी हाय-स्पीड डेटा, जो दरमहा २ जीबी पर्यंत मर्यादित असेल. तसेच हा प्लॅन ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा बजेट फ्रेंडली युजर्ससाठी उपयोगी आहे जे फक्त कॉलिंग आणि कमी डेटा वापरतात किंवा ज्यांना सतत रिचार्ज करायला आवडत नाही.

हा प्लॅन कोण वापरू शकतो ?

पण, ८९५ रुपयांचा हा रिचार्ज प्लॅन फक्त आणि फक्त जिओफोन आणि जिओ भारत फोन युजर्ससाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर हा प्लॅन लागू होणार नाही. पण, मासिक खर्च कमी करू इच्छिणारे युजर्स जिओफोनवर स्विच करून फायदा घेऊ शकतात.त्यामुळे हा रिचार्ज प्लॅन एरटेलवर भारी पडणार आहे.