Jio 5G Welcome Offer: जर तुमच्या शहरात जिओचे 5G नेटवर्क उपलब्ध करून देण्यात आले असेल व आपल्याकडे 5G ला सपोर्ट करणारा फोन असेल तर आपल्यासाठी ही बातमी अत्यंत खास आहे. अलीकडेच रिलायन्सने ग्राहकांसाठी Jio True 5G वेलकम ऑफर लाँच केली आहे. जिओ वेलकम ऑफर अंतर्गत ग्राहकांना 5G नेटवर्कवर १ जीबीपीएस स्पीडने अनलिमिटेड 5G डेटा देण्यात येणार आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी आपल्याला अवघ्या २३९ रुपयांचा रिचार्ज करण्याची गरज आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊयात..

जर तुमच्याकडे 5G क्षमतेचा फोन असेल तर आपल्याला या ऑफरचा लाभ घेता येईल. यासाठी तुमच्या नोंदणीकृत जिओ नंबरवरून माय जिओ ऍप उघडा. जर आपल्या फोनमध्ये अगोदरच माय जिओ नसेल तर आपण गूगल प्ले स्टोअरवरून सुद्धा डाउनलोड करू शकता. ऍपच्या मुख्य पृष्ठावर आपल्याला Jio True 5G Welcome Offer असे लिहिलेला बॅनर दिसेल. यावर आपल्याला ऑफरसाठी साइन अप करण्यास सांगितले जाईल.

tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
How dangerous is excess sugar for children?
अतिरिक्त साखर लहान मुलांसाठी किती धोकादायक? ‘हेल्दी ड्रिंक्स’ म्हणून जाहिरात करण्यास केंद्र सरकारने का केली मनाई?
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम

Jio 5G Welcome Offer साठी साइन अप करताना सर्व माहिती भरल्यावर आपल्याला एका SMS च्या माध्यमातून सर्व तपशील पाठवला जाईल. तुमच्या फोनमध्ये 5G सेवा सुरु होण्यासाठी किमान एक आठवडा जाईल. यानंतर आपल्याला आपल्या नोंदणीकृत जिओ नंबरवर किमान २३९ रुपयांचा एक मोबाईल रिचार्ज करायचा आहे. जर अगोदरच तुमच्याकडे रिचार्ज केलेला असेल तर तुम्ही MyJio ऍपवर प्लॅन अपग्रेड सुद्धा करू शकता.

हे ही वाचा<< विश्लेषण: तुमचा फोन किती वॉटरप्रूफ आहे? आयपी कोड वरून ओळखा, सोपा तक्ता पाहून जाणून घ्या

जियो वेलकम ऑफरसह साइनअप केल्यावर व २३९ रुपयांचा रिचार्ज केल्यावर आपल्याला फोनमध्ये 5G नेटवर्क निवडायचे आहे.

अँड्रॉइड मोबाईलमध्ये Settings>Network and Internet>SIMs>Preferred Network Type या स्टेप्स फॉलो करा.

तर iOS मध्ये आपण Settings> Mobile Data> Mobile Data Options> Voice & Data या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

दरम्यान, आपल्याला My Jio ऍपच्या मुख्य पेजवरच आपण किती 5G डेटा वापरला? किती शिल्लक आहे याची माहिती मिळू शकते.