JioHotstar Subscription Plans : जिओ स्टारने ‘जिओ हॉटस्टार’ (JioHotstar) हा नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. हा प्लॅटफॉर्म जिओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney+ Hotstar) मर्ज केल्यानंतर तयार झाला आहे. त्यामुळे आता युजर जिओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टार प्लॅटफॉर्मवरील कन्टेन्ट एकाच ठिकाणी पाहू शकणार आहोत.

तर जिओ हॉटस्टारचे तीन महिने आणि एक वर्षाच्या सबस्क्रिप्शन प्लॅनची (JioHotstar Plans) माहिती खालीलप्रमाणे…

जिओ हॉटस्टारचे तीन प्लॅन्स सादर करण्यात आले आहेत, ज्यात मोबाईल, सुपर व प्रीमियम अशा प्लॅन्सचा समावेश असणार आहे.

१. मोबाईल (अ‍ॅड्ससह) – यामध्ये १४९ रुपयांमध्ये तुम्हाला तीन महिन्यांचा प्लॅन, तर ४९९ रुपयांमध्ये वार्षिक प्लॅन (१२ महिने) मिळेल. या प्लॅनमध्ये फक्त एका मोबाईल डिव्हाइसला कन्टेंट अ‍ॅक्सेस करता येईल. त्यामध्ये 720p रिझोल्युशनमध्ये तुम्ही कन्टेंट पाहू शकता.

२. सुपर (अ‍ॅड्ससह) – यामध्ये २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला तीन महिन्यांचा अ‍ॅक्सेस मिळेल, तर ८९९ रुपयांमध्ये वर्षभराचा अ‍ॅक्सेस मिळेल. या प्लॅनमध्ये एका वेळी दोन डिव्हाइसवर कन्टेंट पाहता येईल आणि त्यात मोबाईल, लॅपटॉप, सपोर्टेड लिव्हिंग रूम डिवायसेसचा समावेश करता येईल. त्यामध्ये 1080p रिझोल्युशनमध्ये तुम्ही कन्टेंट पाहू शकता.

३. प्रीमियम (अ‍ॅड्सविरहित) – यामध्ये २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये एक महिन्याचा अ‍ॅक्सेस मिळतो. तसेच ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तीन महिने आणि १४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वर्षभराचा अ‍ॅक्सेस दिला जाईल. या प्लॅनमध्ये एकाच वेळी चार डिवायसेसवर कन्टेंटचा अ‍ॅक्सेस मिळेल आणि हा सर्व सपोर्टेड प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होईल. त्यात फक्त लाइव्ह स्पोर्ट्स आणि लाइव्ह शोदरम्यान जाहिराती दिसतील. त्यामध्ये तुम्हाला 4K क्वॉलिटी मिळेल. तसेच डॉल्बी व्हिजन आणि ॲटमास सपोर्टदेखील उपलब्ध आहे.

जिओ सिनेमा युजर्ससाठी जिओ हॉटस्टारची मोफत ऑफर – (JioHotstar Plans)

जिओ हॉटस्टार ॲप उघडताना, जिओ सिनेमा युजर्सना जिओ हॉटस्टार प्रीमियम प्लॅन फ्रीमध्ये वापरण्यासाठी एक ऑफर दिली जात आहे. पण, या मोफत योजनेची वैधता तुमच्या जिओ सिनेमा सबस्क्रिप्शनवर अवलंबून आहे.

कसे ते घ्या जाणून…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • तर जिओ सिनेमाच्या २९ रुपयांच्या मासिक प्लॅनचे सबस्क्रिप्शन प्लॅनची ​​वैधता संपेपर्यंत जिओ हॉटस्टार प्रीमियम प्लॅनमध्ये अपग्रेड केले जातात.
  • जिओ सिनेमाचा २९९ रुपयांच्या वार्षिक प्लॅनची ​​वैधता संपेपर्यंत जिओ हॉटस्टार प्रीमियम प्लॅनमध्ये अपग्रेड केले जाते.

जिओ सिनेमा सदस्यांना जिओ हॉटस्टारचे तीन महिन्यांचे प्लॅन्स सवलतीच्या दरात मिळत आहेत, जेणेकरून ते त्यांची मोफत ऑफर संपल्यानंतरही ओटीटी प्लॅटफॉर्मवर चालू ठेवू शकतील…

  • जिओ हॉटस्टारचा तीन महिन्यांचा १४९ रुपयांचा ‘मोबाईल’ प्लॅन तुम्हाला फक्त ४९ रुपयांमध्ये मिळेल.
  • जिओ हॉटस्टारचा तीन महिन्यांचा २९९ रुपयांचा ‘सुपर’ प्लॅन तुम्हाला फक्त ७९ रुपयांमध्ये मिळेल.
  • जिओ हॉटस्टारचा तीन महिन्यांचा ४९९ रुपयांचा ‘प्रीमियम’ प्लॅन तुम्हाला फक्त २४९ रुपयांमध्ये मिळेल.