JioMart’s Holi Sale: सणासुदीच्या दिवसांना लवकरच देशात सुरुवात होणार आहे. होळी अगदी तोंडावर आली आहे आणि प्रत्येक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उत्पादनांवर सूट देत आहे. JioMart त्यापैकी एक आहे, JioMart ने स्मार्टफोन्सवर भरघोस सूट आणली आहे. जो स्मार्टफोनवर ३५ टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. JioMart इन्स्टंट डिस्काउंटसह, ई-कॉमर्स कंपनीने फोनवर अनेक बँक ऑफर देखील सादर केल्या आहेत आणि त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत, चला तर जाणून घेऊया…

  • SCB क्रेडिट आणि डेबिट कार्डवर १५०० रुपयांपर्यंत १० टक्के झटपट सूट
  • ICICI क्रेडिट आणि क्रेडिट कार्डवर २५०० रुपयांपर्यंत ५ टक्के झटपट सूट
  • BOB डेबिट कार्डवर १५०० रुपयांपर्यंत १० टक्के झटपट सूट

JioMart वर उपलब्ध असलेले टॉप 5 स्मार्टफोनची पाहा यादी

MOTOROLA MOTO G42

Motorola Moto G42 JioMart वर ३५ टक्के इन्स्टंट डिस्काउंट नंतर उपलब्ध आहे ज्यामुळे किंमत १६,९९९ वरून १०,९९९ पर्यंत खाली येते. इतकेच नाही तर JioMart ने काही बँक ऑफर देखील सादर केल्या आहेत.

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
Dubai Floods Tesla boat-mode? Dubai hit by two years' worth of rain in a single day
Dubai Flood: दुबईच्या महापुरातही टेस्ला गाडीनं केली कमाल; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Video 5 Rupees Lemon Jugad How To Clean Gas Burners at Home
अर्ध्या लिंबाच्या रसात ‘ही’ गोष्ट मिसळून अर्धवट पेटणाऱ्या गॅस बर्नरवर करा उपाय; पैसे, वेळ वाचवणारा जुगाड, Video
civil service servants vehicle with a board coming to wrong side
चक्क अधिकाऱ्याच्या गाडीने मोडला वाहतूक नियम! भर रस्त्यावर थांबवताच पेटला वाद, पाहा VIDEO

Moto G42 Snapdragon 680 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. फोन ६.४-इंच AMOLED डिस्प्लेसह सुसज्ज आहे आणि १८W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५०००mAh बॅटरी पॅक करतो. याच्या मागील बाजूस ५०-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि १६-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असलेले तीन कॅमेरे आहेत.

(हे ही वाचा : अवघ्या एका सेकंदात तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणारं ChatGPT काय आहे माहितेयं का? गुगललाही देणार टक्कर? )

IPHONE 12

iPhone 12 JioMart वर ५८,४०० रुपयांच्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे, तर फोनची मूळ किंमत ६४,९०० रुपये आहे. हे अनेक बँक ऑफरसह येते.

iPhone 12 मध्ये ६.१-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. हे A१४ बायोनिक चिपसेटद्वारे समर्थित आहे. फोन २८१५mAh बॅटरी आहे आणि तीन कॅमेरे आहेत, दोन मागे आणि एक समोर, सर्व १२-मेगापिक्सेल सेन्सर आहे.

ONEPLUS 10R 

JioMart ने १० टक्के इन्स्टंट डिस्काउंट ऑफर केला आहे, ज्यामुळे फोनची किंमत ३४,९९९ रुपयांपर्यंत खाली येते. फोनची मूळ किंमत ३८,९९९ रुपये आहे.

OnePlus 10R Mediatek Dimenaity 8100-Max प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. यात ६.७-इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि ५०-मेगापिक्सेलच्या प्राथमिक कॅमेरासह मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये ८०W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५०००mAh बॅटरी आहे.

(हे ही वाचा : Smart TV खरेदी करण्याच्या विचारात आहात तर ‘ही’ Offer एकदा वाचाच; फक्त ६,७४९ रुपयांमध्ये… )

REDMI K50I

Redmi K50i JioMart वर २३,९९९ मध्ये उपलब्ध आहे. JioMart १७ टक्के झटपट सूट देत आहे ज्यामुळे किंमत ३१,९९९ रुपयांपर्यंत खाली आली आहे. इन्स्टंट डिस्काउंट सोबतच बँक डिस्काउंट देखील उपलब्ध आहे.

Redmi K50i Mediatek Dimensity ८१०० SoC द्वारे समर्थित आहे. हे ६.६-इंच FFC LCD सह सुसज्ज आहे जे १४४Hz रिफ्रेश रेटला समर्थन देते. यात मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये ६४-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि १६-मेगापिक्सेल सेल्फी शूटर आहे. फोनमध्ये ६७W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५०८०mAh बॅटरी आहे.

TECNO SPARK 9

Tecno Spark 9 JioMart वर ७,९९९ रुपयांच्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. फोनची मूळ किंमत ११,४९९ आहे. Tecno Spark 9 मध्ये Mediatek Helio G37 प्रोसेसर आणि ६.६-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. याच्या मागील बाजूस १३-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि ८-मेगापिक्सलचा सेल्फी शूटर आहे. Tecno Spark 9 मध्ये ५००० mAh बॅटरी आहे.