बऱ्याच जणांना रात्री उशीरापर्यंत मोबाईलवर चॅटिंग करण्याची किंवा ऑनलाईन कंटेट पाहण्याची सवय असते. अशात बऱ्याच जणांना मोबाईल पाहता पाहता झोप लागते. तर काही जणांना मोबाईल उशीखाली ठेऊन झोपायची सवय असते. पण अशाप्रकारे मोबाईल उशीखाली ठेऊन झोपल्याने गंभीर समस्या उद्भवू शकते. हे आरोग्यासाठी देखील धोकादायक ठरू शकते. कोणत्या समस्या उद्भवू शकतात जाणून घेऊया.

आणखी वाचा : फक्त ४२ रुपयांमध्ये डेटासह कॉलिंगची सुविधा! बीएसएनएलचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन जाणून घ्या

मोबाईलमधील रेडिएशन ठरू शकतात धोकादायक
मोबाईलमधील रेडिएशन आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे म्हटले जाते. उशीखाली फोन ठेऊन झोपल्याने मेंदूमधील सेल्यूलर पातळी कमी होते असे देखील मानले जाते. त्यामुळे उशीखाली फोन ठेऊन झोपणे टाळा.

मोबाईल ओवरहिट झाल्यास आग लागू शकते
अनेक जणांना मोबाईल रात्रभर चार्जिंगला लाऊन ठेवण्याची सवय असते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी त्याची बॅटरी पुर्ण चार्ज असेल. पण असे केल्याने मोबाईल ओवरहिट होण्याची शक्यता असते आणि मोबाईलचा स्फोट होऊ शकतो. तसेच काहीजण मोबाईल चार्जिंगला लाऊन तो उशीखाली ठेवतात. अशात जर मोबाईल ओवरहिट झाला तर आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर कधीच उशीखाली ठेऊ नये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोबाईल चार्जिंग करण्यासाठी त्याच कंपनीचा चार्जर वापरण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही दुसऱ्या कंपनीचा चार्जर वापरला तर मोबाईल खराब होण्याची दाट शक्यता असते. कधीकधी यामुळे मोबाईलचा स्फोट देखील होतो. त्यामुळे मोबाईल चार्ज करण्यासाठी त्याच कंपनीच्या चार्जरचा वापर करावा असा सल्ला दिला जातो.