अनोळखी मोबाईल नंबर अनेकदा अडचणींचे कारण ठरू शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला अँड्रॉईड फोनवर नको असलेले आणि अनोळखी नंबर ब्लॉक करायचे असतील तर यासंबंधी आपण एक सोपा उपाय जाणून घेऊया. गुगल यासाठी एक बाय डिफॉल्ट सेवा प्रदान करते. तथापि, अँड्रॉइड जगात अनेक फोन निर्माते आहेत, त्यामुळे ही पद्धत वेगवेगळ्या कंपनीच्या उपकरणांवर वेगवेगळी असू शकते. स्मार्टफोनमधील उपलब्ध स्क्रीन आणि इंटरफेसनुसार अज्ञात क्रमांक ब्लॉक करण्याची पद्धत बदलू शकते.

अँड्रॉइड फोनवर अज्ञात क्रमांक कसे ब्लॉक करायचे ?

– गुगल फोन अ‍ॅप डाउनलोड करावे.

– अ‍ॅप उघडून डायलर सर्च बारच्या वर उजव्या बाजूला असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.

– सेटिंग्सवर क्लिक करून ब्लॉक नंबरवर जावे.

– Unknown पर्याय सुरु करावे.

– लक्षात ठेवा, अँड्रॉइडमध्ये अज्ञात म्हणजे तुमच्या फोनमध्ये सेव्ह केलेले फोन नंबर नाहीत, तर जे तुमच्या कॉलर आयडीमध्ये खाजगी किंवा अज्ञात म्हणून फ्लॅश करतात त्यांच्यासाठी आहे.

सॅमसंग अँड्रॉइड फोनवर अनोळखी नंबर कसे ब्लॉक करायचे ?

– गुगल फोन अ‍ॅप उघडून डायलर सर्च बारच्या वर उजव्या बाजूला असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.

– सेटिंग्सवर क्लिक करून ब्लॉक नंबरवर जावे.

–  ब्लॉक अननोन/हिडन नंबर (Block unknown/ hidden numbers)वर क्लिक करून प्रायव्हेट आणि अनोळखी नंबर ब्लॉक करा.

शाओमी अँड्रॉइड फोनवर अनोळखी नंबर कसे ब्लॉक करायचे ?

– गुगल फोन अ‍ॅप उघडून डायलर सर्च बारच्या वर उजव्या बाजूला असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.

– सेटिंग्समध्ये जाऊन अननोनवर क्लिक करावे.

(वर दिलेली पद्धत MIUI १२.५वर आधारित स्मार्टफोनसाठी स्पष्ट करण्यात आली आहे. जर तुमच्या शाओमी फोनची आवृत्ती वेगळी असेल तर या पायऱ्यांमध्ये काही बदल असण्याची शक्यता आहे.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनोळखी नंबर ब्लॉक करण्याच्या डिफॉल्ट मार्गाव्यतिरिक्त, ट्रूकॉलर सारखे काही थर्ड पार्टी अ‍ॅप आहेत जे अज्ञात नंबर ब्लॉक करण्यात मदत करतात.