लिंक्डइनमुळे नोकरीच्या शोधात असलेल्यांना सर्वाधिक फायदा होतो. आता लिंक्डइन युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही हिंदीमध्ये नोकरी शोधू शकाल. तसेच जगातील सर्वात मोठ्या व्यावसायिक नेटवर्क लिंक्डइनवर हिंदी कंटेन्ट शेअर आणि प्राप्त करू शकाल. लिंक्डइनवर नुकताच हिंदी इंटरफेस लॉन्च करण्यात आला आहे. यामुळे देशातील जवळपास ६० कोटी हिंदी भाषा बोलणाऱ्या व्यक्तींना फायदा होणार आहे. “भारतीय भाषेतील अडथळे दूर करणं हे लिंक्डइनचे उद्दिष्ट आहे. हिंदी लॉन्च झाल्याने आता जागतिक स्तरावर लिंक्डइनवर २५ भाषांचा वापर होणार आहे.”, असं कंपनीने म्हटलं आहे. लिंक्डइनसाठी भारत सर्वाधिक युजर्स असलेला देश आहे. अमेरिकेनंतर भारतात लिंक्डइनचे सर्वाधिक युजर्स आहे. गेल्या तीन वर्षात भारतात युजर्सची संख्या दरवर्षी १५ टक्क्यांनी वाढली आहे. करोना काळात लिंक्डइन प्लॅटफॉर्मवर नोकरीचा शोध घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती.

लिंक्डइनवर युजर्संना आता फीड, प्रोफाइल, नोकरीची माहिती हिंदीत मिळेल. डेस्कटॉप, अँड्राइड आणि आयओएसवर हिंदीत कंटेन्ट बनवू शकणार आहे. तसेच येत्या काही दिवसात लिंक्डइन बँकिंग आणि सरकारी नोकऱ्यांसह उद्योग क्षेत्रातील संधींना व्यापक बनवण्यासाठी काम करणार आहे. लिंक्डइन प्लॅटफॉर्म येत्या आठवड्यात हिंदी प्रकाशक आणि निर्मात्यांना जोडणार आहे. त्यामुळे सदस्यांच्या सहभागाला आणि हिंदीतील संभाषणांना प्रोत्साहन मिळेल. लिंक्डइनचे मोबाईल अॅप्लिकेशन हिंदीमध्ये पाहण्यासाठी, तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल आणि डिव्हाइसची पसंतीची भाषा म्हणून हिंदी निवडावी लागेल.

लिंक्डइनवर हिंदीचा वापर कसा कराल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • डेस्कटॉपवर, सदस्यांना प्रथम लिंक्डइन मुख्यपृष्ठाच्या शीर्षस्थानी जावे लागेल आणि “मी” आयकॉनवर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर सेटिंग्स आणि प्रायव्हेसी सिलेक्ट करावं लागेल
  • युजर्संना त्यानंतर डाव्या बाजूला अकॉउंट प्रेफरेंसेसवर क्लिक करावं लागेल
  • साइट प्रेफरेंसेस सिलेक्ट करावं लागेल
  • लँग्वेजमध्ये चेंजवर क्लिक करा, त्यानंतर हिंदी भाषेचा पर्याय निवडा
  • सिलेक्ट केल्यानंतर युजर इंटरफेस आणि नेव्हिगेशन हिंदीत डिस्प्ले होईल

ज्या सदस्यांनी हिंदीची प्राथमिक भाषा म्हणून निवड केली आहे. ते त्यांच्या पोस्टवरील “सी ट्रान्सलेशन” या पर्यायावर क्लिक करून संबंधित पोस्टचे हिंदीतील भाषांतर पाहण्यास सक्षम असतील. जर सदस्य लिंक्डइनवर हिंदीमध्ये सामग्री तयार करण्यासाठी हिंदी कीबोर्ड वापरत नसतील, तर त्यांना त्यांच्या कीबोर्डची इनपुट भाषा हिंदीमध्ये बदलावी लागेल किंवा हिंदी कीबोर्ड त्यांच्या डेस्कटॉप किंवा स्मार्टफोनशी कनेक्ट करावा लागेल.