scorecardresearch

‘हे’ आहेत ५ स्वस्त 5G Smartphones; फास्ट चार्जिंग, ८ जीबी रॅमसह मिळतंय बरंच काही, पाहा लिस्ट

Budget 5g Smartphones : तुम्ही आता ५ जी फोन घेण्याचा विचार करत असाल तर बाजारात काही स्वस्त, बजेट फ्रेंडली ५ जी फोन्स उपलब्ध आहेत. कोणते आहेत हे ५ जी फोन्स? जाणून घेऊया.

‘हे’ आहेत ५ स्वस्त 5G Smartphones; फास्ट चार्जिंग, ८ जीबी रॅमसह मिळतंय बरंच काही, पाहा लिस्ट
(pic credit – amazon/pixabay)

Budget 5g Smartphones : भारतात ५ जी सेवा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. ५० शहरांमध्ये आता ५ जी सेवा सुरू आहे. पुढील वर्षापर्यंत ही सेवा संपूर्ण भारतात मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही आता ५ जी फोन घेण्याचा विचार करत असाल तर बाजारात काही स्वस्त, बजेट फ्रेंडली ५ जी फोन्स उपलब्ध आहेत. कोणते आहेत हे ५ जी फोन्स? जाणून घेऊया.

१) सॅमसंग गॅलक्सी एम १३ ५ जी

Samsung Galaxy M13 5G हा स्मार्टफोन अमेझॉनवर ४ जीबी आणि ६४ जीबी व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. अमेझॉनवर ४ जीबी आणि ६४ जीबी स्टोअरेज व्हेरिएंटची लिस्टेड किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे, मात्र त्यावर २९ टक्क्यांची सूट मिळत असल्याने हा फोन आता ११ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. फोनमध्ये रॅमप्लस फीचरसह ८ जीबी रॅम मिळते. इंटरनल मेमरी देखील १ टीबी पर्यंत वाढवता येते. या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो आणि सेल्फीसाठी ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.

(६३ हजारांच्या आत मिळवा महागडा Iphone 14, ‘या’ वेबसाईटवरून करा खरेदी)

२) लावा ब्लेझ ५ जी

Lava Blaze 5G स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम असून ३ जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्ट मिळते आणि १२८ जीबी इंटरनल स्टोअरेज मिळते जी १ टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७०० एसओसी प्रोसेसर, ५० मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेल कॅमेरा, ५००० एमएएच बॅटरी मिळते. लावाच्या संकेतस्थळावर फोन १० हजार ९९९ रुपयांमध्ये मिळत आहे.

३) टेक्नो पोवा ५ जी

Tecno POVA 5G स्मार्टफोन अमेझॉनवर १४ हजार ९९९ रुपायांमध्ये मिळत आहे. फोनची लिस्टेड किंमत २८ हजार ९९९ रुपये असून त्यावर चक्क ४८ टके सूट देण्यात आल्याने किंमत कमी झाली आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोअरेज मिळते. व्हर्चुअल रॅमद्वारे रॅम ११ जीबी पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये ६.९ इंच डिस्प्ले, ६००० एमएएच बॅटरी, फास्ट चार्जिंग, ऑक्टा कोअर ६ एनएम प्रोसेसर आणि ५० एमपी अल्ट्रा क्लिअर कॅमेरा मिळतो.

(आवडत्या Stock पुढे ‘हे’ चिन्ह लावा आणि मिळवा संपूर्ण माहिती, गुंतवणूकदारांसाठी ट्विटरचे अनोखे फीचर)

४) पोको एम ४ प्रो ५ जी

POCO M4 Pro 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर १४ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फोनची लिस्टेड किंमत १६ हजार ९९९ रुपये असून त्यावर ११ टक्के सूट देण्यात आल्याने किंमत घसरली आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोअरेज मिळते. स्टोअरेज १ टीबी पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये ६.६ इंच फूल एचडी डिस्प्ले, ५० एमपी प्रायमरी कॅमेरा, १६ एमपी फ्रंट कॅमेरा, ५००० एमएएच बॅटरी, मीडियाटेक डायमेन्सिटी ८१० प्रोसेसर मिळते.

(तुमच्या बजेटमध्ये बसतो का OnePlus 11 आणि OnePlus 11R? किंमतीबाबत खुलासा, जाणून घ्या)

५) रेडमी ११ प्राइम ५ जी

Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन अमेझॉनवर १३ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळत आहे. वेबसाइटवर फोनची लिस्टेड किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे, मात्र त्यावर १३ टक्के सूट देण्यात आल्याने किंमत कमी झाली आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल स्टोअरेज, ५ हजार एमएएच बॅटरी, ५० मेगापिक्सेल कॅमेरा, एमटीके डायमेन्सिटी ७०० प्रोसेसर, १८ वॉट फास्ट चार्जिंग ही फीचर्स मिळतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 16:03 IST

संबंधित बातम्या