सध्या चंद्राबाबत दोन मोहिमा सुरु आहेत. इस्रोची चांद्रयान ३ आणि रशियाची लूना २५. जूलै महिन्यात भारताने चांद्रयान प्रक्षेपित केले आणि २३ ऑगस्टला ते चंद्राच्या जमिनीवर अलगद उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. विशेष म्हणजे रशियाने १० ऑगस्टला म्हणजे भारताच्या मोहिमेची सुरुवात झाल्यावर तब्बल २६ दिवसांनी लूना २५ चे प्रक्षेपण केले आणि हे यान चांद्रयान ३ च्या दोन दिवस आधीच म्हणजेच २१ ऑगस्टला चंद्रावर अलगद उतरणा आहे.

२० ऑगस्टच्या रात्री लूना २५ हे कक्षा कमी करत चंद्राच्या आणखी जवळ जाणार होते. यासाठी यानावरील इंजिन सुरु करत दिशा बदल केला जाणार होता. मात्र या इजिनांचे योग्य प्रज्वलन झालं नसल्याचं दिसून आलं आहे एवढीच प्राथमिक माहिती रशियाने जाहिर केली आहे. तेव्हा यानाने कक्षा अपेक्षेपेक्षा कमी बदलली का? चंद्रावर उतरण्याच्या वेळेत बदल केला जाणार का? यान भरकटले आहे का?…वगैरे अशी कोणतीही माहिती अजून जाहिर करण्यात आलेली नाही. तेव्हा सध्या तरी रशियाच्या लूना २५ मोहिमबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.

हेही वाचा… चंद्रावर उतरण्याची Chandrayaan 3 ची वेळ ठरली, आता २३ ऑगस्टला संध्याकाळी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असं असलं तरी आत्तापर्यंत चंद्रावर तब्बल सात वेळा अलगद उतरण्यात रशियाने यश मिळवलं असून तीन वेळा चंद्रावरील माती परत आणण्याचा पराक्रम रशियाच्या यानाने केला आहे. १९७६ नंतर लूना २५ ही रशियाची पहिलीच मोहिम असून या निमित्ताने पुन्हा एकदा चांद्र स्पर्धेत रशियाचा उतरण्याचा प्रयत्न करणार आहे.