अ‍ॅपलच्या उपकरणांना बाजारात प्रचंड मागणी आहे. गुणवत्ता आणि नवीन फीचर्समुळे ते ग्राहकांना भुरळ घालतात. अ‍ॅपलेचे एअरबड, स्मार्टवॉच, मॅकबुक, आयफोन ही सर्व उपकरणे अ‍ॅपलच्या काही उपकरणांपैकी एक आहेत, जे ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. अ‍ॅपलने नुकतेच आयफोन १४ सिरीज लाँच केली आहे. यासह कंपनीने काही स्मार्टवॉच देखील लाँच केल्या आहेत. नवीन उपकरणांबरोबर कंपनी आपल्या जुन्या उत्पादनांचीही विल्हेवाट करत असते. अ‍ॅपले तिच्या काही कालबाह्य आणि न वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचा विंटेज यादीमध्ये समावेश करते. यंदा कंपनीने यादीत काही आयमॅक मॉडेल्स आणि अ‍ॅपल वॉच सिरीजमधील मॉडेल्सना या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

मॅकरुमर्सच्या अहवालानुसार कंपनीने उत्पादनांच्या विंटेज यादीमध्ये अ‍ॅपल वॉच सिरीज २ चा समावेश केला आहे. ही स्मार्टवॉच सिरीज २०१६ मध्ये लॉच झाली होती. तसेच कंपनीने २०१३ मध्ये लाँच झालेले २१.५ इंच आणि २७ इंच आयमॅक, २०१४ मध्ये लाँच झालेले २१.५ इंच आयमॅक आणि २७ इंच रेटिना ५ के आयमॅक मॉडेल्सचा देखील या यादीत समावेश केला आहे.

(व्हॉट्सअ‍ॅपमधून महत्वाचा फोटो, व्हिडिओ डिलीट झाला? असे परत मिळवा)

विंटेज अ‍ॅपल उत्पादनांना नियमित सॉफ्टवेअर अपडेट मिळत नाही. तर नवीन आयफोन, आयपॅड किंवा मॅकला किमान पाच वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट मिळतो. अ‍ॅपलनुसार, जेव्हा कंपनी पाच वर्षांहून अधिक काळ आणि सात वर्षांपेक्षा कमी काळ उपकरणाचा पुरवठा बंद करते तेव्हा त्या उपकरणाला विंटेज मानले जाते. याचा अर्थ आता या उपकरणांना पुढे नोटिफिकेशन्स मिळणार नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सात वर्षांपूर्वी विक्री थांबवलेल्या उत्पादनाला अ‍ॅपल गरज नसलेले किंवा वापरले जात नाही असे उपकरण (obsolete products) समजते. याचा अर्थ अशा उत्पादनांना कुठलेही अपडेट मिळणार नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, कंपनी अशा उत्पादनांची दुरुस्ती करणार नाही.