scorecardresearch

Premium

तब्बल ११ वर्षानंतर Mark Zuckerberg यांनी केलं ट्वीट, नेमका विषय काय?

मेटाने अधिकृतपणे आज Threads अ‍ॅप लॉन्च केले आहे.

mark zuckerberg tweet after 11 years
मार्क झुकरबर्ग यांनी शेवटचे ट्वीट २०१२ मध्ये केले होते. (Image Credit-Financial Express)

Meta कंपनी गेले काही दिवस ट्विटरला टक्कर देण्यासाठी Threads अ‍ॅप लॉन्च करण्याची तयारी करत होती. अखेर मेटाने अधिकृतपणे आज Threads अ‍ॅप लॉन्च केले आहे. हे अ‍ॅप ट्विटरला टक्कर देणार आहे. एलॉन मस्क यांच्या ट्विटरला टक्कर देण्यासाठी हे अ‍ॅप लॉन्च करण्यात आले आहे. त्यातच मेटा कंपनीचे सीईओ आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग हे तब्बल ११ वर्षे ट्विटरपासून लांब होते. आज सकाळी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर ते पुन्हा सक्रिय दिसले. त्यांनी एक ट्वीट केले आहे.

मार्क झुकरबर्ग यांनी एक मिम शेअर केले आहे. ज्यामध्ये स्पायडरमॅनच्या कपड्यांमध्ये असलेला एक माणूस त्याच कपड्यांमधल्या दुसऱ्या व्यक्तीकडे बोट दाखवत आहे. हा फोटो १९६७ च्या स्पायडर-मॅन कार्टून “डबल आयडेंटिटी” मधील आहे . ज्यात एक खलनायक नायकाचे रूप धारण करण्याचा प्रयत्न करतो. हे मिम कोणत्याही कमेंट शिवाय पोस्ट करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त ndtv ने दिले आहे.

Asian Games: Vidya Ramraj equals PT Usha history repeated after 39 years Amazing in 400-meter hurdle race
Asian Games: विद्या रामराजची पीटी उषाशी बरोबरी, ३९ वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती; ४०० मीटर अडथळा शर्यतीत केली कमाल
jawan-shahrukh2
१००० कोटी कमावण्याबद्दल शाहरुखने केलेली १० वर्षांपूर्वीच भविष्यवाणी; किंग खानचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
customers buy iphone 15 series at flipkart apple store and amazon
अ‍ॅपलच्या अधिकृत स्टोअर्ससह ‘या’ प्लॅटफॉर्मवरून खरेदी करता येणार iPhone 15; आकर्षक ऑफर्स एकदा पाहाच
Chandrayaan 3 Today after 14 days Vikram And Pragyan To Wake Up From Sleep India Will Cross Finger To Get Chance On Moon Study
Chandrayaan-3: १४ दिवसांनी आज निर्णायक क्षण! ‘विक्रम’ व ‘प्रज्ञान’ने फक्त ‘एवढं’ केल्यास भारताला मिळेल मोठं यश

हेही वाचा : मेटाने ‘हे’ जबरदस्त अ‍ॅप लॉन्च केल्यामुळे Twitter चं टेन्शन वाढणार; जाणून घ्या कसे डाउनलोड करायचे?

मार्क झुकरबर्ग यांनी आधीचे ट्वीट १८ जानेवारी २०१२ रोजी केले होते.

”मला वाटते की जगाला अशा प्रकारच्या मैत्रीपूर्ण समुदायाची गरज आहे आणि मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. थ्रेडस आता App स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.” झुकरबर्ग म्हणाले. थ्रेड्स ट्विटरपेक्षा मोठे होऊ शकतात का या प्रश्नाला उत्तर देताना झुकरबर्ग म्हणाले, ”यासाठी थोडा वेळ लागेल. परंतु मला वाटते की त्यावर १ अब्ज पेक्षा जास्त लोकांसाठी सार्वजनिक संवादासाठी App असावे. ट्विटरजवळ हे करण्याची संधी आहे मात्र त्याने हे केले नाही. अाशा आहे की आम्ही हे करू.”

Threads अ‍ॅप हे नवीन असले तरी इन्स्टाग्रामच्या ब्रॅंडिंग आणि संरचना याच्या अंतर्गत येते. ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यात सहजपणे लॉग इन करता येते आणि कोणत्याही अडचणींशिवाय आपलया मित्रांना शोधू शकतात. थ्रेडस इन्स्टाग्रामचे टेक्स्ट आधारित संभाषण App आहे. हे App लोकांना एकत्रित येण्याची आणि त्यांना आजच्या महत्वाच्या प्रत्येक गोष्टीवर आणि उद्या काय ट्रेडिंग असेल याबद्दल चर्चा करण्याची परवानगी देते. 

खरे तर मेटाला ट्विटरच्या वापरकर्त्यांना टक्कर देण्यासाठी आपल्या इन्स्टाग्राम वापरकर्त्यांमधील एक चतुर्थांश वापरकर्त्यांना थ्रेड्समध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mark zuckerberg tweet after 11 years threads app launch competition with twitter tmb 01

First published on: 06-07-2023 at 15:23 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×