Meta AI assistant : जगभरात जलद मेसेजसाठी व्हॉट्सअ‍ॅप हे अ‍ॅप वापरले जाते. कोट्यवधी नागरिक या अ‍ॅपचा वापर करतात, त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप कंपनीकडूनही त्यांच्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स, अपडेट आणले जातात. आता कंपनीने व्हॉट्सॲपवरच्या मेटा एआय असिस्टंटसाठी मोठा अपडेट जाहीर केला आहे, ज्यात नवीन आवाज, फोटो एडिट फीचर्सचा समावेश आहे. म्हणजेच आता तुम्ही चॅटिंगबरोबर फोटो एडिट अ‍ॅपचाही आनंद व्हॉट्सअ‍ॅपमध्ये घेऊ शकणार आहात.

मेटा एआय जलद प्रगती करत आहे आणि आम्ही जगभरातील लोकांसाठी नवीन फीचर्स आणण्यात आनंदित आहोत. कृपया तुमचा अनुभव शेअर करत राहा आणि तुम्ही Meta AI कशा पद्धतीनी वापरत आहात ते Threads वर आम्हाला टॅग करा. व्हॉट्सॲपवर मेटा एआय सादर केल्याच्या एका वर्षात, या तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्यांकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे,” असे कंपनीने सांगितले.

तर नवीन फीचर्सची यादी पुढीलप्रमाणे :

टॉक टू मी :

मेटा एआय म्हणजे एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली आहे, जी तुमच्या प्रश्नांना उत्तर देईल. तुम्ही तिला विचारलेल्या गोष्टींवर माहिती देऊ शकते, तुमच्याशी संवाद साधू शकते आणि ती तुम्हाला सहाय्यसुद्धा करू शकते. काहीही विचारण्यासाठी फक्त वेव्हफॉर्म बटण दाबा, प्रेस करून ठेव. जसजसे हे फीचर रोल आउट करणे सुरू होईल, तसतसे तुम्हाला जगभरातील सेलिब्रिटींच्या आवाजासह विविध व्हॉइस पर्यायांमधून निवडण्याचा पर्यायदेखील दिला जाईल.

हेही वाचा…Samsung Galaxy : प्री-बुकिंग करा अन् सात हजार रुपयांचे डिस्काउंट मिळवा! किंमत, फीचर्स, व्हेरिएंटबद्दल जाणून घ्या

लूक ॲट दीस :

आता तुम्ही मेटा एआयला फोटो पाठवून तुमच्या आसपासच्या जगाबद्दल उत्तर मिळवू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही विदेशी भाषेतल्या मेनूचा फोटो काढून मेटा एआयला पाठवला तर तो तुम्हाला भाषांतर करून देईल किंवा जर तुम्ही एखाद्या झाडाचा फोटो पाठवून त्याची काळजी कशी घ्यावी हे सुद्धा विचारू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एडिट माय फोटो :

Meta AI आता तुम्हाला तुमचे फोटो एडिट करण्यास मदत करू शकते. तुम्ही काही गोष्टी त्यात जोडू, काढू किंवा बदलू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही बॅग्राऊंडमधून एखाद्या व्यक्तीला काढू शकता किंवा एखाद्या वस्तूचा रंग बदलून पाहू शकता, तर आदी फीचर्सचा तुम्ही वापर करू शकणार आहात.