scorecardresearch

Microsoft ने लाँच केली ChatGPT टीम प्रीमियम सेवा, वापरकर्त्यांना मिळणार ‘हे’ फायदे

मायक्रोसॉफ्ट कंपनीने नवीन टेक स्टार्टअप OpenAI मध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

Microsoft and chatgpt premium service launch
Microsft And ChatGpt – लोकसत्ता ग्राफिक्स टीम

सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. दिग्गज कंपनी Microsoft ने बुधवारी AI chatbot ChatGpt द्वारे आपली टीम प्रीमियम सेवा लाँच केली. या सेवेचा उपयोग हा OpenAI च्या मालकीच्या AI चॅटबॉट ChatGPT द्वारे स्वयंचलितपणे मिटिंग नोट्स तयार करणे, कामे सांगण्यासाठी आणि टीम वापरकर्त्यांसाठी मिटिंग टेम्प्लेट तयार करणे यासाठी होणार आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने नवीन टेक स्टार्टअप OpenAI मध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये या गुंतवणुकीबद्दल घोषणा केली आहे. या गुंवणूकीअंतर्गत मायक्रोसॉफ्ट OpenAI ला सुपर कॉम्प्युटर आणि क्लाउड कॉम्प्युटिंग सपोर्ट देणार आहे. मायक्रोसॉफ्टने ओपनएआय मध्ये $१० बिलियन म्हणजेच सुमारे ८२,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे . अनेक अहवालांमध्ये सांगितले जात आहे की, मायक्रोसॉफ्टने आपल्या सर्च इंजिन Bing मध्ये OpenAI ला सपोर्ट करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा : ChatGpt Plus: चॅटबॉट वापरासाठी आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे, जाणून घ्या

मायक्रोसॉफ्टने बुधवारी ओपनएआय चॅटबॉट चॅटजीपीटी सोबत टीम प्रीमियम सेवा लाँच केली आहे. या प्रीमियम सेवेची किंमत जून महिन्यापर्यंत दरमहा $७ म्हणजेच सुमारे ६०० रुपये असणार आहे. जुलै महिन्यापासून ती किंमत $१० म्हणजेच सुमारे ८०० रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

नवीन टेक स्टार्टअप OpenAI ने बुधवारी ChatGPT Plus ची घोषणा केली. AI चॅटबॉट चॅटजीपीटीसाठी पेड सब्स्क्रिप्शन प्लॅन आहे.ChatGPT च्या पेड सब्स्क्रिप्शनसाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला २० डॉलर म्हणजेच १,६०० रुपये भरावे लागणार आहेत. या आधी वापरकर्त्यांना चॅटबॉट चॅटजीपीटी वापरण्यासाठी $४२ म्हणजे सुमारे ३,४०० रुपये प्रति महिना भरावे लागतील असा दावा केला जात होता. 

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 09:48 IST