मायक्रोसॉफ्ट टीमने वॉकी टॉकी फिचर सर्व युजर्ससाठी जारी केलं आहे. पुश टू टॉक फिचर दोन वर्षांपूर्वी लॉन्च केलं होतं. याचा वापर करोना संकटात फ्रंटलाइन वर्कर्सना तात्काळ वापरासाठी झाला होता. आता हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही डिव्हाइसाठी एक्सेस केलं जाऊ शकते. वॉकी टॉकी फिचर वापरकर्त्यांना विशिष्ट चॅनेलद्वारे त्यांच्या उर्वरित टीमशी कनेक्ट होऊ शकते. विशेष म्हणजे, बाहेरील लोक चॅनलमधील लोकांनी परवानगी दिल्याशिवाय संवाद साधू शकत नाहीत. मायक्रोसॉफ्टचा दावा आहे की, या फीचरमुळे लोकं मोठ्या वॉकी टॉकी उपकरणांपासून मुक्त होतील. हे वायफाय आणि सेल्युलर इंटरनेट कनेक्टिव्हिटीद्वारे संवादाचे एक सुरक्षित माध्यम आहे.

सध्या, हे फिचर प्री इंस्टॉल नाही. टीम्स सॉफ्टवेअरमध्ये वॉकी टॉकी वापरण्यासाठी अ‍ॅडमिन सेंटरवर जाऊन अ‍ॅप सेटअप पॉलिसीमध्ये जोडावे लागेल. एकदा ऑन केल्यानंतर फिचर पुढील ४८ तासांत अ‍ॅपवर उपलब्ध होईल. वॉकी-टॉकी फिचर आयफोन आणि आयपॅड सारख्या आयओएस मोबाइल उपकरणांवर आणि अँड्रॉइड मोबाइल उपकरणांवर उपलब्ध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मायक्रोसॉफ्टने एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे, “ज्या वेळी कंपन्यांकडे लोकांची कमतरता आहे आणि पुरवठा साखळी प्रभावित होत आहे. लोकांना वेळ वाचवण्यासाठी आणि इतरांशी संवाद साधण्यासाठी तंत्रज्ञान फायद्याचं ठरेल, आम्ही त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहोत.”