Xiaomi कंपनीकडून अनेक जबदरस्त मोबाईल लाँच केले जात आहेत. यातील अनेक मोबाईल युजर्सची चांगली पसंत मिळते. अशात Xiaomi ने अलीकडेच Xiaomi 13 Pro मध्ये Android 13 आधारित MIUI 14 अपडेट लाँच केले आहे. हे अपडेट Xiaomi, Redmi आणि Poco च्या स्मार्टफोन्सच्या इतर फोनमध्येही वापरता येणार आहे.

लवकरचं Xiaomi 12 Pro, Mi 11 Ultra, Mi 11X Pro 5G, Mi 11T Pro, Redmi Note 12 Pro+ 5G, Mi 11X, Redmi Note 12 Pro 5G, Redmi K50i 5G, Xiaomi 11 Lite आणि NE5G यांसारख्या मोबाईल्समध्ये हे अपडेट मिळू शकणार आहे. यात Redmi 11 Prime 5G चाही समावेश आहे

olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
How To Save Electricity Bill Through Cooler
उन्हाळ्यात कुलरमुळे येणारं वीज बिल कमी करण्यासाठी कमाल जुगाड; प्लास्टिकच्या बाटलीचा ‘असा’ वापर करुन पाहा अन् पैसे वाचवा
Here's Why You Should Never Reheat Cooking Oil
Reusing Cooking oil: एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का? आरोग्यासाठी ठरू शकते घातक

युजर्सना MIUI 14 मध्ये Enlarge Folder ची सुविधा मिळते. ज्यातून युजर्सना फोल्डरचा आकार वाढवता येतो. आत्तापर्यंत तुम्ही होम स्क्रीनवरुन फोल्डर हटवू शकत होतो किंवा ओपन करुन शकत होतो. पण या नव्या अपडेटमुळे तुम्हाला फोल्डरचा आकार वाढवण्याचे ऑप्शन देण्यात आले आहे. यासह तुम्ही मोबाईलमधील प्री-इंस्टॉल अॅप देखील हटवू शकता.

iPhone युजर्ससाठी आले IOS 16.4 अपडेट; मिळणार ‘हे’ जबरदस्त फिचर्स, जाणून घ्या डाउनलोडिंग प्रोसेस

Android 13 आधारित MIUI 14 मध्ये पॉकेट मोड देण्यात आला आहे. जेणेकरून मोबाईल खिशात असताना तो खराब होणार नाही. याशिवाय MIUI 14 मध्ये 6 नवीन वॉलपेपर देण्यात आले आहेत. यासोबतच कंपनीने सेटिंग मेनू देखील पूर्वीपेक्षा अधिक क्लीन आणि व्यवस्थित केला आहे.

Xiaomi च्या नवीन अपडेटमध्ये म्हणजेच MIUI 14 मध्ये, तुम्ही फोटोमधील मजकूर कॉपी करू करणार आहात. या प्रकारची सुविधा सॅमसंग, ऍपल आणि गुगल फोनमध्ये आधीपासूनचं होती.

नवीन अपडेटमुळे तुम्ही तुमच्या कोणत्याही फोटोवर वॉटरमार्क टाकू शकता. याशिवाय इमेजमधून ऑब्जेक्ट, शॅडो किंवा पिक्चर डिलीट करू शकता म्हणजे ऑब्जेक्ट डिलीट करण्याचे ऑप्शन देखील उपलब्ध आहे.

ज्याप्रमाणे कट आउट फीचर iOS 16 मध्ये उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे Xiaomi च्या MIUI 14 मध्ये देखील हे फीचर देण्यात आले आहे. यामुळे तुम्ही कोणताही फोटो बॅकग्राऊंडपासून वेगळा करु शकता. या नवीन अपडेटमध्ये तुम्हाला ड्युअल फ्लोटिंग विंडो, कॉम्प्रेस व्हिडिओ क्लॉलिटी आणि व्हिडिओ एडिट करण्यासाठी प्रो मोड ऑप्शन मिळाले आहे.