Moto G31: मोटोरोलाने 50 MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह स्मार्टफोन केला लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्य

मोटोरोलाने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. नव्या Moto G31 ची किंमत १५ हजार रुपयांच्या खाली आहे.

Moto-G31
Moto G31: मोटोरोलाने 50 MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह स्मार्टफोन केला लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्य

मोटोरोलाने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. नव्या Moto G31 ची किंमत १५ हजार रुपयांच्या खाली आहे. या स्मार्टफोनमध्ये ediaTek Helio G85 SoC असून Realme Narzo 50A आणि Xiaomi Redmi Note 9 सारखी क्षमता देते. इतर प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये ५० एमपी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, 20W टर्बो पॉवर फास्ट चार्जिंग बॅटरी, ६.४-इंच AMOLED डिस्प्ले आणि बरेच काही आहे. Moto G31 चे या महिन्याच्या सुरुवातीला युरोपमध्ये पहिल्यांदा अनावरण करण्यात आले होते.

भारतात नवीन Moto G31 ची किंमत १२,९९९ रुपयांपासून सुरू होते. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेल १४,९९९ रुपयांनाी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन बेबी ब्लू आणि मेटियोराइट ग्रे या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. नवीन Moto G31 Flipkart द्वारे ६ डिसेंबर रोजी विक्रीसाठी उपलब्ध होईल. Moto G31 मध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर आहे, जो Mali-G52 MC2 GPU सह जोडलेला आहे. हे ६ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबी अंतर्गत स्टोरेजसह आहे. मायक्रोएसडी कार्ड स्लॉट वापरून अंतर्गत स्टोरेज १ टीबीपर्यंत वाढवण्याचा पर्याय आहे. ६० एचझेड रिफ्रेश रेट, ४०९ पीपीआय पिक्सेल डेन्सिटी आणि २०:९ आस्पेक्ट रेशिओसह ६.४ इंच फुल एचडी अमोलेड होल-पंच डिस्प्लेसह आहे.

Qlan: ऑनलाइन गेमर्ससाठी मिळणार नवा प्लॅटफॉर्म; भारतीय स्टार्टअप सोशल नेटवर्कसाठी सज्ज

नवीन Moto G31 स्मार्टफोन मागील बाजूस तीन कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहे. सेटअपमध्ये एफ/१.८ अपर्चर, पीडीएएफ आणि क्वाड-पिक्सेल तंत्रज्ञानासह ५० एमपी मुख्य सेन्सर समाविष्ट आहे. यात एफ/२.२ अपर्चरसह ८ एमपी वाइड-एंगल कॅमेरा आणि एफ/२.४ अपर्चरसह २ एमपी मॅको सेन्सर आहे. डिव्हाइस ड्युअल कॅप्चर, पोर्ट्रेट, लाइव्ह फिल्टर, स्पॉट कलर, नाईट व्हिजन, एआर स्टिकर्स, प्रो मोड आणि बरेच काही यासारखी कॅमेरा वैशिष्ट्ये ऑफर करते. समोर 13MP सेल्फी कॅमेरा आहे. कंपनीने फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. हे २० W टर्बोपॉवर चार्जिंग होते. मोटोरोलाचा दावा आहे की, युजर्संना ३६ तासांपर्यंत बॅटरी लाइफ मिळेल. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ४ जी, एलटीई, एफएम रेडिओ, ३.५ एमएम ऑडिओ जॅक, ब्लूटूथ व्ही ५, वाय-फाय ८०२.११ एसी, यूएसबी टाइप सी पोर्ट, जीपीएस आणि ग्लोनास यांचा समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Moto g31 motorola launches smartphone with 50 mp triple rear camera rmt