मोटोरोला एकामागून एक स्मार्टफोन लॉन्च करत असून अनेक डिव्हाइस प्रतिक्षेत आहेत. लेनोवोच्या मालकीची कंपनी आता २०० मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सरसह स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. सॅमसंगने सप्टेंबरमध्ये आपला नवीन २०० एमपी ISOCELL कॅमेरा सेन्सर लॉन्च केला होता. मात्र आत्तापर्यंत कोणत्याही स्मार्टफोन कंपनीने हा सेन्सर वापरला नाही. आता असा अंदाज आहे की, सॅमसंगचा २०० एमपी ISOCELL कॅमेरा सेन्सर वापरणारी मोटोरोला ही पहिली स्मार्टफोन कंपनी असेल. मोटोरोलाचा २०० मेगापिक्सेल कॅमेरा असलेला स्मार्टफोन २०२२ मध्ये लॉन्च होऊ शकतो. यामुळे फोटोग्राफीची आवड असण्याऱ्यांची स्वप्नपूर्ती होईल.

“२०० एमपी कॅमेऱ्याचं सर्वात आधी मोटोद्वारे अनुकरण केलं जाईल. त्यानंतर Xiaomi द्वारे पुढील वर्षाच्या उत्तरार्धात आणि २०२३ पर्यंत सॅमसंग २०० एमपीचं अनुकरण करेल.”, असं टिपस्टर आइस युनिव्हर्सने ट्विटरवर पोस्ट केले. टिपस्टरने मोटोरोला लॉन्च केलेल्या स्मार्टफोनचे नाव उघड केले नाही किंवा लॉन्चिंगचा अवधीही सांगितला नाही. Xiaomi नेहमी सॅमसंगचे नवीन सेन्सर प्रथम स्वीकारते. मात्र यावेळी मोटोरोलाने पुढाकार घेतला आहे. Xiaomi २०२२ च्या पुढील सहामाहीपर्यंत सेन्सर वापरणार नाही, असं दिसतंय.

JioPhone Next: रिलायन्स डिजिटलवर सेल सुरू; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

दुसरीकडे, आगामी मोटोरोला डिव्हाइस ५०-मेगापिक्सेल कॅमेऱ्यांसह येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे २०० मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर्ससह मोटोरोला फोन हातात येण्यासाठी २०२२ पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. मोटोरोलाकडून सध्या Edge 20 सीरिजची विक्री सुरु आहे. जी १०८ मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सरसह येते. आणखी एक मोटो मिड-रेंजर, मोटो G60 मध्ये देखील १०८मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर आहे. मोटोरोलाने मोटो जी २००, मोटो जी ७१, मोटो जी ५१, मोटो जी ४१ आणि मोटो जी ३१ जागतिक बाजारात लॉन्च केले आहे. कंपनी लवकरच भारत आणि इतर बाजारात मोटो जी ७१, मोटो जी ५१ आणि मोटो जी ३१ लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे.