रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील एक मोठी कंपनी आहे. याचे प्रमुख मुकेश अंबानी आहेत. मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज यावर्षी भारतात २८ ऑगस्ट रोजी भारतात वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणार आहे. या सभेला अध्यक्ष मुकेश अंबानी संबोधित करणार असून ते वापरकर्त्यांसाठी विशेषतः जिओच्या संदर्भात प्रमुख घोषणा करतील.

रिलायन्स AGM 2023: लाइव्ह कसे पाहायचे ?

आगामी रिलायन्स AGM २०२३ इव्हेंट २८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता सुरू होणार आहे. हा लाइव्ह इव्हेंट तुम्ही कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनेल आणि सोशल मीडिया हँडलवर थेट पाहू शकता. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

हेही वाचा: आता व्याकरणाच्या चुका कमी होणार; Google ने लॉन्च केले ‘हे’ भन्नाट फिचर, जाणून घ्या

काय अपेक्षित?

Jio 5G Plans : रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कंपनी भारतातील विविध शहरांसाठी नवीन जिओ ५जी प्लॅन्सची घोषणा करू शकते. २०२४ पर्यंत सर्वत्र जिओ ५जी सेवा रोलआऊट करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. Jio ने आत्तापर्यंत 5G सेवा प्रदान करण्यासाठी विद्यमान 4G प्लॅन्सचा वापर केला असल्याने, कंपनी या इव्हेंटमध्ये ५जी प्लॅन्सची घोषणा करण्याची शक्यता आहे.

JioPhone 5G 2023: जिओने मागील वर्षी भारतात आपला पहिला ४जी स्मार्टफोन लॉन्च केला होता. कंपनी यंदाच्या इव्हेंटमधेय ५जी कनेक्टिव्हिटीसाठी एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करू शकते. MySmartPrice ने बेंचमार्किंग साइट Geekbench वर Jio 5G स्मार्टफोन पाहिला. सूचीवरून असे दिसून आले की या फोनला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480+ चिपसेटचा सपोर्ट , ४जीबी रॅम आणि अँड्रॉइड os वर चालणारा फोन असू शकतो.

हेही वाचा: Xiaomi चा धमाका; ‘या’ सिरीजमधील स्मार्टफोनच्या तब्बल ३ लाख युनिट्सची केली विक्री, किंमत…

Jio AirFiber 2023: जिओने मागील वर्षी झालेल्या इव्हेंटमध्ये Air Fiber 5G नावाचे 5G हॉटस्पॉट डिव्‍हाइसची घोषणा केली होती. तथापि, इव्हेंटमध्ये वास्तविक डिव्हाइस लॉन्च करण्यात आले नव्हते. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात जिओ भारतात Jio AirFiber ची किंमत आणि त्याची उपलब्धता जाहीर करेल. हे डिव्हाइस घरी आणि ऑफिसमध्ये हाय-स्पीड हॉटस्पॉट ऑफर करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले नाही.