scorecardresearch

Premium

व्हॉईस मेसेजसाठी येणार नवं अपडेट! संवाद होणार आणखीन सुरक्षित; पाहा काय होणार बदल

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक सोयीस्कर फिचर घेऊन येत आहेत

New update for voice messages WhatsApp Communication will be more secure
(फोटो सौजन्य : लोकसत्ता.कॉम) व्हॉईस मेसेजसाठी येणार नवं अपडेट!

अनेक सोशल मीडिया अ‍ॅप एकमेकांशी स्पर्धा करत स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी रोज नवनवीन फिचर घेऊन येत असतात. तर यातच मेटाच्या मालकीचे अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आघाडीवर आहे. तर आता व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आणखीन एक सोयीस्कर फिचर घेऊन येत आहेत. वापरकर्त्यांना या नवीन फिचरचा खूप फायदा होणार आहे. काय असणार हे नवं फिचर पाहू…

व्हॉट्सअ‍ॅपने यापूर्वीच म्हणजे २०२१ मध्ये युजर्सच्या खासगी फोटो, व्हिडीओसाठी एक खास फिचर सादर केले. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये युजरच्या चॅटमध्ये गेल्यावर कॅमेरा आयकॉनवर क्लिक करून फोटो किंवा व्हिडीओ सिलेक्ट करायचा. त्यानंतर एका वर्तुळात तुम्हाला एक हा आकडा दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर फोटो, व्हिडीओ ‘सेट टू व्ह्यू वन्स’ म्हणजे समोरचा युजर तुमचा फोटो फक्त एकदाच पाहू शकणार आणि त्याचा स्क्रीनशॉट किंवा इतरांना तो पाठवण्याची परवानगीसुद्धा त्याला नसणार. तर आता हे फिचर व्हॉट्सअ‍ॅप व्हॉईस मेसेजसाठीसुद्धा घेऊन येत आहे.

Kitchen Jugaad To Avoid Potatoes Sprout Or Batata Turning Green Bad
बटाट्याला कोंब येऊ नये, बटाटा हिरवा पडू नये म्हणून घरी आणताच करा हा सोपा उपाय; पैसे व आरोग्य दोन्ही वाचवा
Gas Stove vs Electric Stove
गॅस की इलेक्ट्रिक: कोणती शेगडी आहे चांगली? दोन्हीपैकी कोणती शेगडी वापरणे आहे फायदेशीर?
WhatsApp New Feature Will Allow You To block unwanted contacts directly from Lock Screen now
स्पॅम मेसेजमुळे त्रस्त आहात? WhatsAppच्या नवीन फीचरद्वारे कॉन्टॅक्ट होणार थेट स्क्रीनवर ब्लॉक
Disney Plus to stop password sharing
काय! नेटफ्लिक्सनंतर Disney Plus देखील ‘पासवर्ड शेअरिंग’ करणार बंद!! माहिती जाणून घ्या

हेही वाचा…WhatsApp वर व्हिडीओ कॉलदरम्यान ऐकता येणार गाणी; पाहा काय आहे खास

व्हॉट्सअ‍ॅपने नुकतेच व्हॉईस मेसेजसाठी ‘व्ह्यू वन्स’ नावाचे एक नवीन फिचर सादर केले आहे; एकदा व्हॉईस मेसेज ऐकल्यावर तो चॅटमधून नाहीसा होणार. एका ब्लॉग पोस्टमध्ये व्हॉट्सअ‍ॅपने या नवीन फिचरची घोषणा केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने व्हॉईस मेसेजसाठी हा फिचर वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीसाठी डिझाईन केला आहे. तुम्ही व्हॉईस मेसेज पाठवताना व्ह्यू वन्स या आयकॉनवर क्लिक करा. या फिचरमुळे तुमचा व्हॉईस मेसेज इतर कोणालाही फॉरवर्ड केला जाणार नाही आणि समोरचा युजर फक्त एकदाच तुमचा व्हॉईस मेसेज ऐकू किंवा तो प्ले करू शकेल.

एकदाच प्ले होणारा व्हॉईस मेसेज पाठवण्यासाठी तुम्हाला नेहमीप्रमाणे तुमचा मेसेज रेकॉर्ड करावा लागेल, त्यानंतर तो पाठवण्यापूर्वी व्ह्यू वन्स या आयकॉनवर क्लिक करा. यामुळे समोरचा व्हॉट्सअ‍ॅप युजर तुमचा व्हॉईस मेसेज एकदाच ऐकू शकेल आणि नंतर त्यांच्या चॅट हिस्टरीमधूनसुद्धा ते अदृश्य होईल. व्हॉट्सअ‍ॅपवरील तुमच्या सर्व खासगी संदेशांप्रमाणे, एकदाच प्ले होणारे व्हॉइस मेसेज डिफॉल्टनुसार एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह संरक्षित केले जातात. याचा अर्थ असा की, स्वतः WhatsApp देखील ते पाहू किंवा ऐकू शकत नाही. तर आता व्हॉट्सअ‍ॅप सर्व वापरकर्त्यांसाठी हे भन्नाट फिचर घेऊन येईल. प्रत्येक युजर फोटो आणि व्हिडीओसह एकदा प्ले होणारे व्हॉईस मेसेजदेखील इतरांना पाठवू शकतील आणि पर्सनल गोष्टी सहज शेअर करू शकतील.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New update for voice messages whatsapp communication will be more secure asp

First published on: 08-12-2023 at 20:26 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×