नव्या वर्षाची सुरुवात होताच नवनवे संकल्प केले जातात. कोणी व्यायाम करण्याचा तर कोणी डाएट करण्याचा संकल्प करते. नवीन वर्ष सूरु होत असताना असे अनेक संकल्प केले जातात. यासह काही चांगल्या गोष्टींची स्वतःला सवय लावण्याचाही अनेकजण प्रयत्न करतात. सध्या सर्वांची एक कॉमन वाईट सवय कोणती? यावर सतत फोन वापरणे हे उत्तर अगदी योग्य असेल. यावरही नियंत्रण मिळवण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. काही अ‍ॅप्स यासाठी मदत करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही अ‍ॅप्स तुम्हाला तुमच्या डिजिटल लाईफवार अधिक नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करतात. यातील सर्व अ‍ॅप्स नवे नाहीत पण हे २०२३ चिंतामुक्त करण्यासाठी मदत करणारे ठरतील. जाणून घ्या कोणते आहेत हे अ‍ॅप्स.

दुसरा अ‍ॅप
या अ‍ॅपवरून तुमचा वेगळा फोन नंबर तयार केला जातो, जो तुम्ही रेस्टॉरंट, मॉल किंवा अनावश्यक रेजिस्ट्रेशनच्या ठिकाणी देऊ शकता. यामुळे तुमचा नंबर सुरक्षित राहील आणि तुम्हाला कोणतेही स्पॅम कॉल्स येणार नाहीत. अनेकठिकाणी आपल्याला नंबर शेअर करावा लागतो, ज्यावरुन तुम्हाला स्पॅम कॉल्स येण्याची शक्यता असते, ते या अ‍ॅपच्या मदतीने टाळता येऊ शकते.

नेटिव्ह अल्फा
नेटिव्ह अल्फा वापरुन वेब अ‍ॅप्स तयार करता येतात. ज्यामुळे तुम्ही वापरत असलेल्या किंवा सतत पाहत असलेल्या वेबसाईट्स एकाच ठिकाणी उपलब्ध होतात.

युनिफाईड रिमोट
युनिफाईड रिमोट या अ‍ॅपचा वापर करून मोबाईलवरून कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप कंट्रोल करता येते. यासाठी दोन्ही उपकरणं एकाच वायफायला जोडलेली असणे आवश्यक आहे. या अ‍ॅपमुळे काम करणे अधिक सोपे होते.

यावर्षी WhatsApp मध्ये करण्यात आले ‘हे’ बदल; यातील तुमच्या आवडीचे फीचर कोणते?

व्हॉइस
सतत चिडचिड होणाऱ्या, कामावर लक्ष केंद्रित न करू शकणाऱ्या, तणावामध्ये असणाऱ्या किंवा मानसिक आरोग्याशी निगडित समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी हे अ‍ॅप फायदेशीर आहे. या अ‍ॅपला ‘ मेंटल हेल्थ गायडन्स ॲप’ म्हटले जाते. यामध्ये असणाऱ्या ऑडिओ सेशन्समुळे युजर्सना ठरविक ध्येय गाठण्यासाठी मदत केली जाते. यामध्ये एखादे काम सोप्या पद्धतीने, चांगल्या प्रकारे कसे करायचे याचे सायकॉलॉजिकल स्किल शिकवले जाते असा या ॲपचा दावा आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New year 2023 try these new android apps this year know its amazing benefits pns
First published on: 27-12-2022 at 18:07 IST