स्मार्टफोनवर उपलब्ध असणाऱ्या अनेक अ‍ॅप्समुळे कोणाशीही संवाद साधणे खूप सोप्पे झाले आहे. संवाद साधण्याबरोबर आपण आपल्या जवळच्या व्यक्तींशी आपल्याला आवडलेल्या व्हिडीओची, गाण्यांची लिंक देखील शेअर करतो. तर कधीकधी आपल्याला मोठ्या फाइल्स किंवा एखादा चित्रपट शेअर करायचा असेल तेव्हा टेलिग्राम अ‍ॅपची मदत घेतली जाते. टेलिग्रामवर मोठ्या फाइल्स शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. पण अनेक जणांकडे हे अ‍ॅप नसते. अशावेळी तुम्ही व्हॉटसअ‍ॅपची मदत घेऊ शकता. व्हॉटसअ‍ॅपवरून मोठ्या फाइल्स कशा शेअर करता येतील जाणून घ्या.

काही सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही व्हॉटसअ‍ॅपवरून २ जीबी पर्यंतची फाइल देखील शेअर करू शकता. सुरक्षेच्या दृष्टीने टेलिग्रामपेक्षा व्हॉटसअ‍ॅप जास्त सुरक्षित आहे. त्यामुळे तुम्ही व्हॉटसअ‍ॅपवरून मोठ्या फाइल्स शेअर करण्याचा पार्याय निवडू शकता.

आणखी वाचा : फोन चोरी झाल्यास ॲप्पल आणि सॅमसंग युजर्सना कळणार लोकेशन; जाणून घ्या काय आहे नवे फीचर

व्हॉटसअ‍ॅपवरून मोठ्या फाइल्स शेअर करायच्या असतील तर सर्वात आधी गूगल प्ले स्टोअरवरून व्हॉटसअ‍ॅप बीटा वर्जन डाउनलोड करा. बीटा वर्जनमध्ये सामान्य वर्जनपेक्षा एक्स्ट्रा फीचर उपलब्ध आहेत. बीटा वर्जनमधून २ जीबीपर्यंतची फाइल पाठवणे शक्य आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोठ्या फाइल्स पाठवण्यासाठी या स्टेप्स वापरा

  • सर्वात आधी बीटा व्हॉटसअ‍ॅप उघडा. त्यातील अटॅचमेंट पर्यायावर क्लिक करा.
  • त्यामध्ये व्हॉटसअ‍ॅप कॅमेरा, गॅलरी, ऑडिओ, लोकेशन, डॉक्युमेंट आणि फोटो हे ६ पर्याय दिसतील.
  • या पर्यायांमधून डॉक्युमेंट (व्हॉटसअ‍ॅप) वर क्लिक करा.
  • यानंतर फाइल मॅनेजरमधून कोणती फाइल किंवा चित्रपट पाठवायचा आहे तो निवडा. तुम्हाला ज्या क्रमांकावर ही फाइल पाठवायची आहे त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर ती फाइल किंवा चित्रपट एमकेवी (MKV) फॉरमॅटमध्ये पाठवला जाईल.