सध्या ५ जी फोनची क्रेज आहे. गतिमान इंटरनेटसाठी लोक आता ५ जी फोन्सकडे वळत आहे. ग्राहकांना गुणवत्तापूर्ण कनेक्टिव्हिटी मिळावी म्हणून मोबाईल कंपन्यांनी देखील बाजारात आपले ५ जी फोन्स लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे. वन प्लसने ५० मेगापिक्सल असलेला आपला दमदार ५ जी फोन १० टी ५ जी (10 T 5G) मार्केटमध्ये उपलब्ध केला आहे. याची सुरुवाती किंमत ४९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. मात्र, हा महागडा फोन ५ हजार रुपयांनी स्वस्त मिळू शकतो. याबाबत जाणून घेऊया.

OnePlus 10T 5G फोन हा अ‍ॅमेझॉनवर धमाकेदार ऑफरसह उपलब्ध आहे. ऑफरमध्ये तुम्ही 5 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह हा फोन खरेदी करू शकता. या सवलतीसाठी, तुम्हाला अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पैसे द्यावे लागतील. ही ऑफर फोनच्या सर्व प्रकारांसाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेतला तर तुम्हाला 12 हजार ९०० रुपयांपर्यंतचा अतिरिक्त फायदा मिळू शकतो. वनप्लस १० टी ५ झी फोन 16GB पर्यंत रॅम आणि 256 जीब पर्यंतच्या अंतर्गत स्टोरेजसह येतो. त्याची सुरुवातीची किंमत 49 हजार 999 रुपये आहे.

फोनमध्ये आहेत हे आकर्षक फिचर्स

वनप्लस फोनमध्ये 6.7 इंचाचा फूल एचडी फ्लुइड एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये आढळणारा हा डिस्प्ले 120 हर्ट्झचा रिफ्रेश दर आणि 360 हर्ट्झ च्या टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी यात कॉर्निंग गोरिला ग्लास देण्यात आला आहे. फोनमध्ये 16 जीबी पर्यंत एलपीडीडीआर ५ रॅम आणि 256 जीब पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. याने तुम्हाला अधिकाधिक फोटो आणि व्हिडिओ तुमच्या मोबाइलमध्ये सेव करता येतील. प्रोसेसर म्हणून, यात ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 + जनरल 1 चिपसेट आहे, जो त्याची क्रियाशीलता वाढवते.

चांगल्या फोटोंसाठी ५० मेगापिक्सलचा कॅमेरा

फोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. आहे. यामध्ये 50 मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरासह 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. त्याचबरोबर, सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल.

सुरक्षेसाठी फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने

सुरक्षेसाठी फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज आहे. फोनमध्ये 4 हजार 800 एमएएचची बॅटरी आहे जो अधिक काळ फोनला सुरू ठेवते. बॅटरी 150 वॉट सुपर व्हीओओसी चार्जिंगला सपोर्ट करते. ओएस बद्दल बोलायचे झाले तर हा फोन अँड्रोइड १२ वर आधारित ओक्सिजन ओएस १२.१ वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला ड्युअल सिम, 5जी, वाय-फाय, ब्लुटूथ 5.2, एनएफसी, जीपीएस आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक सारखे पर्याय देण्यात आले आहेत.