scorecardresearch

Premium

Oneplus 9 Pro 5g स्मार्टफोनवर १९,००० रुपयांची मिळतेय घवघवीत सूट! जाणून घ्या Amazon ची जबरा ऑफर

Oneplus 9 Pro 5g स्मार्टफोनवर १९,००० रुपयांची मिळतेय घवघवीत सूट जाणून घ्या सविस्तर.

Oneplus 9 Pro 5g smartphone is getting a huge discount
Oneplus 9 Pro 5g स्मार्टफोनवर १९,००० रुपयांची मिळतेय घवघवीत सूट!(photo: financial express)

Oneplus 9 Pro सध्या त्याच्या लाँच किमतीवरून १५,०० रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे. कंपनीने हा फोन जक्या वर्षी लाँच केला होता. ज्यावेळी या स्मार्टफोनची किंमत ६४,९९९ रुपये ठेवण्यात आली होती. पण आता तुम्ही हा दमदार फोन फक्त ४५,७४९ रुपयांना खरेदी करू शकता. ही ऑफर Amazon The Great India Freedom Sale दरम्यान उपलब्ध आहे जिथे फोन सर्वात कमी किमतीत मिळू शकतो. या वनपल्स फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्हाला क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर पाहायला मिळेल. यासोबतच ४८ एमपी हॅसल ब्लड कॅमेरा आणि १२ जीबी रॅम मेमरी देण्यात आली आहे. कामगिरीच्या बाबतीत, कोणत्याही फोनला टक्कर देण्याची ताकद या फोनमध्ये आहे.

Oneplus 9 Pro च्या ऑफर्सबद्दल तपशीलवार बोलायचे झाले तर हा फोन कंपनीने ६४,९९९ रुपयांना लाँच केला होता. पण सध्या हे ऑनलाइन स्टोअर Amazon India हाच फोन १५,००० च्या डिस्काउंटसह ४९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. यासोबतच कंपनी एसबीआय क्रेडिट कार्डवर ४,२५० रुपयांची अतिरिक्त सूट देत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही हा फोन फक्त ४५,७४९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तसंच, Amazon Pay आणि ICICI कार्ड पेमेंट सारख्या इतर अनेक ऑफर देखील आहेत, त्यामुळे तुम्हाला ३०० रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल. त्याच वेळी, EMI वर देखील १,२५० रुपयांची सूट दिली जात आहे. पण सर्वात मोठी ऑफर फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डवर आहे.

Honor 90 to be available discounted price on amazon great indian festival sale
Amazon Great Indian Festival Sale 2023: २०० मेगापिक्सलचा कॅमेरा असणाऱ्या Honor च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार ११ हजारांचा डिस्काउंट, ऑफर्स पाहाच
Buy google pixel 7a rupees 4,700 rs flipkart big billion days sale
४,७०० रुपयांमध्ये खरेदी करा Google Pixel 7a; ‘या’ प्लॅटफॉर्मवर मिळतेय आकर्षक ऑफर, एकदा पाहाच
Amazon Great Indian Festival sale 2023 offer on lava agni 2 motorola and samsung galaxy se 23 ultra
Amazon Great Indian Festival Sale 2023: सॅमसंगसह ‘या’ कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डिस्काउंट ऑफर्स, एकदा बघाच
flipkart 52100 rs discount on google pixel 7
Flipkart Big Billion Days Sale 2023 : गुगलचा ‘हा’ ५२ हजारांचा स्मार्टफोन ८ हजारात खरेदी करण्याची संधी, काय आहे ऑफर?

( आणखी वाचा: iPhone13 वर ऑफर्सचा पाऊस! मिळतेय ३० हजार रुपयांची घवघवीत सूट)

Oneplus 9 Pro चे तपशील

कंपनीने ६.७ इंच स्क्रीनसह Oneplus 9 Pro सादर केला आहे. हा फोन डिस्प्लेसाठी LTPO तंत्रज्ञानाला सपोर्ट करतो आणि तुम्हाला त्यात Fluid AMOLED पॅनल मिळेल. त्याच वेळी, हा फोन १२०Hz स्क्रीन रिफ्रेश रेटसह HDR 10 Plus ला देखील समर्थन देतो. फोनच्या स्क्रीनवर तुम्हाला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ चे संरक्षण मिळते. कामगिरीच्या बाबतीत, हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेटवर चालतो जो २.८४GHz पर्यंत जास्तीत जास्त क्लॉक स्पीडला सपोर्ट करतो. त्याच वेळी, तुम्हाला ८जीबी आणि १२जीबी रॅम मेमरी मिळते आणि स्टोरेजसाठी १२८जीबी आणि २५६जीबी पर्याय उपलब्ध आहेत.

कॅमेर्‍याबद्दल बोलायचे तर, OnePlus 9 Pro मध्ये क्वाड रियर कॅमेरा सपोर्ट आहे, ज्याचा मुख्य कॅमेरा F/१.८ अपर्चर सह येतो, कंपनीने फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर वापरला आहे. हा कॅमेरा हॅसल ब्लड सर्टिफाइड आहे, जो फोटोग्राफीसाठी खास मानला जातो. दुसरीकडे, दुसरा सेन्सर ५० मेगापिक्सेलचा आहे, जो अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येतो. तिसरा सेन्सर ८ मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स आहे आणि चौथा २ मेगापिक्सलचा मोनोक्रोम लेन्स आहे. समोर १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.पॉवर बॅकअपबद्दल बोलायचे झाल्यास, यात ४,५००mAh बॅटरी आहे जी ६५W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Oneplus 9 pro 5g smartphone is getting a huge discount of rs 19000 gps

First published on: 07-08-2022 at 18:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×