OPPO A1 PRO launch date : स्मार्टफोन कंपनी ओप्पो लवकरच आपला नवा फोन OPPO A1 PRO लाँच करणार आहे. कंपनी १६ नोव्हेंबरला चीनध्ये हा फोन सादर करेल. कंपनीने या फोनचा टीजर देखील सादर केला आहे. ओप्पोने चीनमधील मायक्रोब्लॉगिंगसाइट विबोवर या फोनचे पोस्टर देखील शेअर केले आहेत.

फोनमध्ये ओलईडी डिस्प्ले मिळणार असून त्यात ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असणार आहे, ज्यात १०८ मेगापिक्सेलचा कॅमेरा असेल. फोन पंच होल डिस्प्लेसह दिसून आला आहे. फोनमध्ये वेगवान कार्यासाठी स्नॅपड्रॅगन ६९५ एसओसी मिळण्याची शक्यता आहे. फोनमध्ये सेल्फी कॅमऱ्यासाठी होल पंच कटआऊटसह कर्व्ह डिस्प्ले पॅनल असल्याचे दिसून आले आहे.

(ड्रोन टॅक्सीने करता येणार मजेदार प्रवास, पॅरिसमध्ये झाली चाचणी, पाहा व्हिडिओ)

अलिकडेच एका लिकमध्ये फोनला ६.७ इंच फूल एचडी डिस्प्ले मिळणार असल्याचे पुढे आले होते. फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेज मिळणार असल्याचे सांगितल्या जाते. हा फोन ओप्पो ए ९८ चे रिब्रँडेड व्हर्जन असल्याचे मानले जाते, ज्याबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. हा फोन टीईएनएए सर्टिफिकेशन संकेतस्थळावर मॉडेल क्रमांक पीएचक्यू ११० सह झळकला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा असेल, असे म्हटल्या जाते. ४ हजार ७०० एमएएच बॅटरी आणि ६७ वॉट फास्ट चार्जिंगसह हा फोन ग्राहकांसाठी उपलब्ध होऊ शकतो. फोनमध्ये ड्युअल स्पिकर सेटअप मिळण्याचीही शक्यता आहे.