Paytm हे एक ऑनलाइन पेमेंट करण्याचे माध्यम आहे. याच्या मदतीने आपली बरीच आर्थिक कामे सोपी होतात. आजकालच्या काळामध्ये डिजिटल पद्धतीने पेमेंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतामध्ये डिजिटल पेमेंटसाठी गुगल पे, फोन पे आणि पेटीएम आणि अन्य अ‍ॅप्सचा वापर केला जातो.  पेटीएम देशातील एक आघाडीची पेमेंट आणि आर्थिक सेवा कंपनी आहे. पेटीएम देशातील एक अग्रगण्य ब्रँड आहे. या लोकप्रिय पेटीएम ब्रँडने त्यांचे नवीन कार्ड साउंडबॉक्स या सुविधेची घोषणा केली आहे. याबद्दल आपण अधिक जाणून घेणारच आहोत. याआधी देखील पेटीएमने टीएमचे मालक असलेल्या वन९७ कम्‍युनिकेशन्‍स लिमिटेड (ओसीएल) ने दोन नाविन्‍यपूर्ण पेमेंट डिव्हाइसेस लॉन्च केले आहेत. यात पेटीएम पॉकेट साउंड बॉक्स व पेटीएम म्‍युझिक साउंड बॉक्स लॉन्च केले आहेत. ज्याचा फायदा व्यापाऱ्यांना होणार आहे.

पेटीएम या प्लॅटफॉर्मने कार्ड साउंडबॉक्स या नवीन फीचरची घोषणा केली आहे. ‘टॅप अँड पे’ सुविधा असलेल्या आयकॉनिक साऊंडबॉक्‍सच्‍या माध्‍यमातून व्यापाऱ्यांना सर्व व्हिसा, मास्टरकार्ड, अमेरिकन एक्सप्रेसआणि रूपे नेटवर्कमध्ये मोबाइल आणि कार्ड पेमेंट्स स्वीकारणे सोपे होणार आहे. यामुळे त्यांचा व्यवसाय वाढण्यास अधिक मदत होणार आहे.

हेही वाचा : Paytm ने लॉन्च केलेले ‘हे’ साउंडबॉक्स ठरणार व्यापाऱ्यांसाठी गेमचेंजर, फोन कनेक्ट करून ऐकू शकता गाणी

नव्याने लॉन्च करण्यात आलेले पेटीएम कार्ड साउंडबॉक्स व्यापाऱ्यांच्या फायदेशीर ठरणार आहे. हे डिव्हाइस व्यापाऱ्यांना ११ भाषांमध्ये अलर्ट देण्यास सक्षम आहे. ‘टॅप अँड पे’ च्या मदतीने व्यापारी जवळजवळ ५ हजार रुपयांपर्यंतचे कार्ड पेमेंट स्वीकारू शकणार आहेत. या मेड इन इंडिया साउंडबॉक्समध्ये ४ जी नेटवर्कचा सपोर्ट मिळणार आहे. यात ४ वॅटचा स्पीकर देण्यात आला आहे. हा साउंडबॉक्स एकदा चार्ज केला की याची बॅटरी तब्बल पाच दिवस टिकणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पेटीएम भारतातील लघु व्‍यवसायांसाठी नाविन्‍यता आणण्‍यामध्‍ये, त्‍यांच्‍या पेमेंट्स व आर्थिक सेवांसंदर्भातील समस्‍यांचे निराकरण करण्‍यामध्‍ये नेहमी अग्रस्‍थानी आहे. आज पेटीएम कार्ड साऊंडबॉक्‍ससह आम्‍ही या सेवेला नव्‍या उंचीवर घेऊन जात आहोत. आमच्‍या निदर्शनास आले आहे की, व्‍यापाऱ्यांना व ग्राहकांना पेटीएम क्‍यूआर कोडसह मोबाइल पेमेंट्सप्रमाणे सुलभपणे कार्ड पेमेंट्स स्‍वीकारता येईल अशा सुविधेची गरज आहे. लॉन्च करण्‍यात आलेले कार्ड साऊंडबॉक्‍स दीर्घकाळापर्यंत व्‍यापाऱ्यांच्‍या दोन गरजा त्यात मोबाइल पेमेंट्स व कार्ड पेमेंट्सना एकत्र करेल.” असे पेटीएमचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा म्हणाले.