Paytm हे एक ऑनलाइन पेमेंट करण्याचे माध्यम आहे. याच्या मदतीने आपली बरीच आर्थिक कामे सोपी होतात. आजकालच्या काळामध्ये डिजिटल पद्धतीने पेमेंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतामध्ये डिजिटल पेमेंटसाठी गुगल पे, फोन पे आणि पेटीएम आणि अन्य अ‍ॅप्सचा वापर केला जातो. भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्‍यूआर व मोबाइल पेमेंट्सचा अग्रणी ब्रँड पेटीएमचे मालक असलेल्या वन९७ कम्‍युनिकेशन्‍स लिमिटेड (ओसीएल) ने आज ४जी सक्षम दोन नाविन्‍यपूर्ण पेमेंट डिव्हाइसेस लॉन्च केले आहे. यात पेटीएम पॉकेट साउंड बॉक्स व पेटीएम म्‍युझिक साउंड बॉक्सचा समावेश आहे.

पेटीएम पॉकेट साऊंडबॉक्‍स: फीचर्स आणि खासियत

पेटीएम पॉकेट साउंडबॉक्स अशा पद्धतीने तयार करण्यात आला आहे की व तुमच्या खिशामध्ये सहजपणे मावू शकतो. त्याचा आकार डेबिट कार्डच्या आकाराइतका आहे. कायमच ज्या व्यापाऱ्यांकडे गर्दी असते त्या व्यापाऱ्यांना हा पॉकेट साउंडबॉक्स त्वरित ऑडिओ पेमेंट्स अलर्ट देतो. हे डिव्हाइस ‘मेड इन इंडिया’ अंतर्गत तयार करण्यात आले आहे. एकदा चार्ज केल्यास याची बॅटरी ५ दिवस इतकी टिकते. तसेच यामध्ये ४जी कनेक्टिव्हीटी आणि अंधुक प्रकाशात सुस्‍पष्‍ट दिसण्‍यासाठी टॉर्च असेकाही फीचर्स देण्यात आले आहेत.

हेही वाचा : Phone Pe चा मोठा निर्णय! यापुढे पेमेंट होताच ऐकू येणार मराठी आवाज

पेटीएम म्‍युझिक साऊंडबॉक्‍स: फीचर्स आणि खासियत

पेटीएम म्युझिक साउंडबॉक्समध्ये देण्यात आलेला स्पीकर पेमेंटबाबत नोटिफिकेशन्स देतो. तसेच ब्लूटूथच्या माध्यमातून गाणी ऐकण्यासाठी हा बॉक्स फोनला कनेक्ट देखील करता येऊ शकतो. यामध्ये एकदा चार्ज केल्यास ७दिवस टिकणारी बॅटरी, ४जी कनेक्टिव्हीटी आणि शक्तिशाली असा ४ वॅट चा स्पीकर आहे. यात व्हॉइस ओव्हरले अशी एक सुविधा आहे जी व्यापाऱ्यांना म्युझिक सुरु असताना पेमेंट नोटिफिकेशन्‍स ऐकण्‍याची सुविधा देते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पेटीएमचे संस्थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा म्‍हणाले, “मोबाइल पेमेंट्स व क्‍यूआर तंत्रज्ञानाचे अग्रणी म्‍हणून आम्‍ही पेटीएम साउंडबॉक्ससह इन-स्‍टोअर पेमेंट्समध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे. आम्‍ही दोन नवीन डिव्हाइसेस पेटीएम पॉकेट साउंडबॉक्स व पेटीएम म्‍युझिक साउंडबॉक्ससह नाविन्‍यतेला अधिक चालना देत आहोत. हे दोन्‍ही डिव्हाइसेस व्‍यापाऱ्यांना सोयीसुविधा देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. पेटीएम पॉकेट साउंडबॉक्स व्‍यस्‍त असलेल्‍या व्‍यापाऱ्यांसाठी गेमचेंजर ठरेल, तर पेटीएम म्‍युझिक साउंडबॉक्स पेमेंट अलर्टस् देतो आणि जीवनशैलीमधील समस्‍यांचे निराकरण देखील करतो. या नवीन डिवाईसेससह आम्‍ही भारतातील लहान दुकानांसाठी तंत्रज्ञानामध्‍ये अग्रस्‍थानी राहू.”