सध्याच्या काळ हा डिजिटल पेमेंटचा काळ आहे. हल्ली पानटपरी, फेरीवाल्याची गाडीर, चहाचा स्टॉल, मोठ्या हॉटेलपासून स्टेशनरीच्या दुकानांपर्यंत सगळीकडे यूपीआय व्यवहार केले जात आहेत. कुठेही काहीही खरेदी करा? ग्राहक दुकानदाराकडे स्कॅनर कोड मागतात. यासाठी प्रामुख्याने देशामध्ये गुगल पे, फोन पे आणि पेटीएम या Apps चा वापर केला जातो. हे Apps डिजिटल पेमेंट सुलभ होण्यासाठी व या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या मालकीचे असणाऱ्या Paytm ने अ‍ॅपवर ‘pin recent payments’ या फीचरची घोषणा केली आहे. या फीचरच्या मदतीने वापरकर्त्यांना पेमेंट करणे अधिक सोपे व्हावे असा कंपनीचा उद्देश आहे. याबाबतचे वृत्त techlusive ने दिले आहे.

हेही वाचा : अनलिमिटेड कॉलिंग,४० जीबी बोनस डेटा आणि…; Reliance Jio च्या ८४ दिवसांच्या ‘या’ प्लॅन्समध्ये मिळतात अनेक फायदे

पेटीएमने आणलेल्या या फीचरच्या मदतीने वापरकर्ते ५ महत्वाचे पेमेंट्स टॉपमध्ये पिन करू शकणार आहेत. म्हणजेच ज्यांना तुम्हाला दररोज किंवा सारखे व पेमेंट करावे लागते असे पेमेंट्स तुम्ही टॉपमध्ये पिन करू शकता. पिन केल्यामुळे तुम्हाला हे पाच पेमेंट्स कायम वरतीच दिसतील. त्यामुळे upi ने पैसे पाठवणे अधिक वेगवान होणार आहे.

”मोबाइल पेमेंटमध्ये आम्ही पेटीएम सुपर App वर वापरकर्त्याचा अनुभव वाढवण्यासाठी सतत नवीन फीचर्स आणत आहोत. आमचे ‘पिन कॉन्टॅक्ट फिचर’ देखील या फीचर्समधीलच एक भाग आहे. जे युपीआय पेमेंट्स अधिक जलद आणि सुलभ व्हावीत यासाठी आणण्यात आले आहे. वापरकर्त्याच्या वेळ वाचावा आणि पेमेंट करताना शक्य तितका चांगला अनुभव मिळावा यासाठी हे डिझाईन केले आहे ”असे पेटीएमच्या प्रवक्त्याने सांगितले.

पेटीएमने आणलेले हे फिचर तुमच्या अ‍ॅपवर वापरू इच्छित असाल तर पिन रीसेंट पेमेंट्स फिचर कसे वापरावे याबद्दलच्या स्टेप्स जाणून घेऊयात.

हेही वाचा : ५० मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह ७ जुलैला लॉन्च होणार Samsung चा ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन, काय असू शकतात फीचर्स

१ : सर्वात आधी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये Paytm डाउनलोड करावे लागेल.

२. पेटीएम ओपन केल्यानंतर युपीआय मनी सेक्शन ट्रान्सफर सेक्शन अंतर्गत टू मोबाइल किंवा कॉन्टॅक्ट या पर्यायांवर क्लिक करावे.

३. तिथे तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या कॉन्टॅक्टची लिस्ट दिसेल. ज्यांना तुम्ही युपीआयच्या मदतीने पैसे पाठवले आहेत.

४. त्यानंतर कोणताही कॉन्टॅक्ट किंवा मोबाइल नंबर पिन करण्यासाठी लिस्टमधील त्यांचा आयकॉन किंवा त्यांच्या नावावर लॉन्ग प्रेस करा.

५. लॉन्ग प्रेस केल्यानंतर तिथे तुम्हाला एक पॉप-अप मेनू दिसेल.

६. त्या पॉप अप मेनूवर क्लिक केले असता कॉन्टॅक्ट किंवा मोबाइल नंबर तुमच्या स्क्रीनवर टॉपला पिन होईल.

आता तुम्ही जर का पेटीएमवर काही कॉन्टॅक्ट पिन केले आहेत. तर तुम्ही आता थेट त्यांच्या आयकॉनवर जाऊन पेमेंट करू शकता. तसेच जर का तुम्हाला ते अनपिन करायचे असेल तर त्या पेमेन्टवर लॉंग प्रेस करावे व ‘अनपिन’ वर क्लिक करावे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paytm pin recent payments feature pin repeat payments help users how to use check details tmb 01
First published on: 28-06-2023 at 12:40 IST