AI म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी क्रांती झाल्याचे पाहायला मिळते. या नव्या तंत्राच्या मदतीने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होताना दिसत आहेत. AI च्या मदतीने कलाकार डिजिटल माध्यमामध्ये काम करत कलाकृती तयार करत आहेत. सोशल मीडियावर सध्या असे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अनेक ऐतिहासिक जागा, महत्त्वपूर्ण लोकांचा समावेश असल्याचे दिसते. अगदी खरे वाटणारे फोटो या तंत्राद्वारे बनवले जात आहे. काही दिवसांपूर्वी ताजमहाल या जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या आश्चर्याच्या निर्मितीदरम्यानचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता एका आर्टिस्टने श्रीमंत लोक जीममध्ये गेल्यावर कसे दिसतात हे AI च्या मदतीने दाखवले आहे.

Sk Md Abu Sahid (@sahixd )या एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने हे AI वर तयार केलेले फोटो शेअर केले आहेत. श्रीमंत लोक जीममध्ये गेल्यावर कसे दिसतील हे त्याने मिडजर्नीचा वापर करून दाखवले आहे. या फोटोंमध्ये त्याने जेफ बेझोस,बिल गेट्स, रतन टाटा, मुकेश अंबानी, एलॉन मस्क आणि इतर अनेक श्रीमंत लोकांचे AI फोटो शेअर केले आहेत.

What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल

हेही वाचा : Reliance Jio ने लॉन्च केला ११९ रुपयांचा स्वस्त प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार…

साहिदने शेअर केलेल्या पोस्टला १,३०० पेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. तसेच अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत. काही जणांनी अकल्पनीय फोटो तयार केल्याबद्दल AI चे कौतुक केले आहे.

प्रतिक्रिया देताना “Money+Muscles= POWER,” असे एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले. तर दुसऱ्याने रतन टाटा यांचा फोटो सर्वात चांगला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.