Realme च्या Realme 9 5G आणि Realme 9 SE 5G स्मार्टफोनची विक्री आज दुपारी १२ वाजता सुरू झाली आहे. कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन्स १४,९९९ रुपये आणि १९,९९९ रुपयांच्या किमतीत लॉन्च केले आहेत. तुम्हाला Realme 9 5G आणि Realme 9 SE 5G स्मार्टफोनपैकी कोणतेही फोन खरेदी करायचे असतील तर हे स्मार्टफोन Flipkart आणि Realme.com वर उपलब्ध आहेत. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये कंपनीने 5G कनेक्टिव्हिटी आणि 48MP ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे.

या दोन्ही फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं झालं तर, Realme 9 SE फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G चिपसेट आणि 144Hz रिफ्रेश रेटसह 30W चार्जिंग सपोर्ट दिला जात आहे. Realme 9 5G मध्ये MediaTek Dimensioty 810 चिपसेट देण्यात आला आहे. दोन्ही फोन पंच होल कॅमेरा आणि फिंगरप्रिंट सेन्सरसह येतात.

Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
Bengaluru man’s post on BMTC bus conductor
बस कंडक्टरने दिले नाही ५ रुपये, प्रवाशाने अशी घडवली अद्दल! तिकिटाचा फोटो होतोय व्हायरल
Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स
Wrist ticket, Metro 1, Mumbai,
मुंबई : ‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकीट सेवा कार्यान्वित

Realme 9 5G, Realme 9 5G वर ऑफर
Realme 9 5G स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. 4GB RAM + 64GB स्टोरेजच्या बेस व्हेरिएंटची किंमत १४,९९९ रुपये आहे. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसाठी भारतीय किंमत १७,४९९ रुपये आहे. Realme 9 5G दोन कलरच्या ऑप्शनमध्ये मिळतो. Mentor Black आणि Stargaze White हे दोन कलर आहेत. ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, ICICI आणि SBI क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI वर १,५०० रुपयांची सूट दिली जात आहे.

यासह, Realme 9 5G SE च्या 6GB आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट २२,९९९ रुपयांना देण्यात आला आहे. Realme 9 5G SE Steary Glow आणि Azure Glow कलर ऑप्शनसह येतो. त्याच वेळी, ऑफरमध्ये ICICI आणि SBI बँक क्रेडिट कार्डवर २००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

आणखी वाचा : उन्हाळ्यात AC घ्यायचा विचार करताय ? ४०० रूपयांमध्ये मिळतोय हा Mini Portable AC

Realme 9 5G SE स्पेसिफिकेशन
Realme 9 5G SE चा डिस्प्ले 6.6 इंचाचा आहे. यात FHD +, 144Hz रिफ्रेश रेट आणि 2412×1080 पिक्सेल रिझोल्यूशन आहे. हे Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. 8GB LPDDR4x रॅम, 128GB स्टोरेज पर्यंत वाढवता येतो. 5GB व्हर्च्युअल रॅमलाही सपोर्ट करतं. हे Realme UI 2.0 सह Android 11 द्वारे समर्थित आहे.

कॅमेरा आणि बॅटरी

हा फोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो. यात f/1.8 अपर्चर आणि 6P लेन्ससह 48MP आहे. तसंच, मोनोक्रोम पोर्ट्रेट लेन्स आणि मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे, तर 16MP सेल्फी स्नॅपर देण्यात आला आहे. दुसरीकडे, कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, GPS आणि USB टाइप-सी पोर्ट मिळतात. यात 30W डार्ट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी पॅक करते.

Realme 9 5G स्पेसिफिकेशन
या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, 6.5-इंचाचा FHD+ डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. यामध्ये MediaTek Dimensity 810 चिपसेट आहे, जो 6GB LPDDR4x रॅम, 128GB स्टोरेजसह जोडलेला आहे. हा स्मार्टफोन Realme UI 2.0 सह Android 11 द्वारे समर्थित आहे.

आणखी वाचा : Apple चा हा स्मार्टफोन झाला १४ हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या संपूर्ण माहिती

कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर यात ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. ज्यामध्ये 48MP सह दोन मायक्रो लेन्स देण्यात आले आहेत. तर सेल्फीसाठी 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय 5,000mAh बॅटरीसह 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यात 5G, 4G LTE, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, GPS आणि USB टाइप-सी पोर्ट आहे.