scorecardresearch

Realme च्या ‘या’ फोनच्या विक्रीला आजपासून सुरुवात, स्वस्त किंमतीमध्ये मिळणार iPhone चे फीचर्स

रीअलमीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये ६.५२ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे.

realme c 55 smartphone sale start today
आयफोनला टक्कर देणारा स्मार्टफोन (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Realme ने गेल्या आठवड्यात भारतात आपला बजेट स्मार्टफोन Realme C55 लॉन्च केला आहे. आता देशात प्रथमच Realme चा हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. फोनचा पहिला सेल मंगळवारी (२८ मार्च २०२३ )सुरु होणार आहे. ज्यामध्ये कंपनी लॉन्च ऑफर देखील देत आहे. Realme चा हा बजेट फोन iPhone 14 Pro च्या Dynamic Island सारख्या Mini Capsule फीचरसह येतो.

Realme C55 मधील फीचर्स

रीअलमीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये ६.५२ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. त्यासह यात फुल एचडी+ रिफ्रेश रेट आणि ६८० निट्स ब्राइटनेस असे फीचर्स आहेत. ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट पॅनल असलेल्या या स्मार्टफोनला पातळ बेझल आहे. रीअलमी कंपनीच्या या श्रेणीतील अन्य स्मार्टफोन्समध्ये या अपडेटेड आढळत नाहीत. फोन वापरताना त्यातील मिनी कॅप्सूल फीचरमुळे आयफोनच्या डायनॅमिक आयलॅंड फीचरचा भास होतो. यामुळे नोटिफिकेशन टूल अ‍ॅक्सेस करताना अधिकची मदत होते.

हेही वाचा : Iphoneला टक्कर देण्यासाठी ‘ही’ कंपनी भारतात लॉन्च करणार नवा स्मार्टफोन; अनेक भन्नाट फीचर्स असूनही किंमत आहे फक्त…

या स्मार्टफोनमध्ये ८ जीबी IPDDR4X रॅम आणि २५६ जीबीपर्यंत Emmc ५.१ स्टोरेजसह पेअर केलेला ऑक्टा कोअर मीडियाटेक हेलिओ G88 प्रोसेसर उपलब्ध आहे. त्याव्यतिरिक्त या स्मार्टफोनची ५,००० एमएएच बॅटरीची क्षमता आहे आणि ३३ व्हॉल्टेज फास्ट चार्जिंग ऑप्शन देखील आहे. Realme C55 मध्ये फक्त ४ जी नेटवर्क सेवा वापरता येणार आहेत. तसेच बायोमेट्रिक्स आणि एनएफसीसाठी साइड माउंटेड फिंगर प्रिंट स्कॅनर या सुविधा देखील आहेत. यात ६४ मेगापिक्सल प्रायमरी शूटर आणि २ मेगापिक्सल इन-डेप्थ सेन्सर असलेला ड्युअल कॅमेरा या स्मार्टफोनला जोडलेला आहे. याचा फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे.

Realme C55 ची किंमत आणि ऑफर्स

रिअलमी सी ५५ या स्मार्टफोनवर कंपनी ICICI बँक आणि HDFC या कार्डने व्यवहार केल्यास या फोनवर तुम्हाला १,००० रुपयांची सूट मिळणार आहे. हा फोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याची किंमत कंपनीने १०,९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ११,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन तुम्हाला ऑफरमुळे १०,९९९ रुपयां खरेदी करता येणार आहे. तर ८ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज असणारा फोन तुम्ही १३,९९९ ऐवजी १२,९९९ मध्ये खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Realme C 55 या संर्टफोनची विक्री आज (२८ मार्च) पासून सुरु झाली आहे हा फोन तुम्ही रिअलमी स्टोअर आणि Flipkart वर दुपारी १२ वाजल्यापासून खरेदी करू शकणार आहात. तसेच तुम्ही हा फोन Rainy Night आणि Sun Shower या रंगांमध्ये खरेदी करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 13:46 IST

संबंधित बातम्या