scorecardresearch

‘या’ कंपनीने लाँच केला ७ हजारांचा स्मार्टफोन; काय आहेत फीचर जाणून घ्या

फक्त ७ हजार रुपये किंमत असणारा एक स्मार्टफोन नुकताच लाँच झाला आहे. हा फोन कोणत्या कंपनीचा आहे आणि कुठून खरेदी करता येईल जाणून घ्या.

‘या’ कंपनीने लाँच केला ७ हजारांचा स्मार्टफोन; काय आहेत फीचर जाणून घ्या
(Photo : Freepik)

सध्या सर्वत्र दिवाळीची तयारी सुरू झाली आहे. या सणांच्या दिवसांमध्ये अनेक नव्या गोष्टींची खरेदी केली जाते. अनेक ऑनलाईन सेलदेखील या खरेदीसाठी ग्राहकांना आकर्षित करत मोठी सूट जाहीर करतात. किराणा सामानापासून मोठ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांपर्यंत ऑनलाईन सेलमध्ये सूट जाहीर करण्यात येते. त्यामुळे ग्राहक नवीन वस्तु घेण्यासाठी अधिक उत्सुक असतात. त्यातच आता एका नव्या स्मार्टफोनच्या किंमतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

रेडमी एवन प्लस (Redmi A1 Plus) भारतात कधी लाँच होणार यावरून गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती. शिओमी रेडमी एवन प्लस भारतात लाँच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली होती. नुकताच हा फोन केनियामध्ये लाँच करण्यात आला आहे.

आणखी वाचा : युट्यूबवर विना जाहिरात व्हिडीओ पाहण्यासाठी वापरा ही सोप्पी ट्रिक

किंमत
केनियामध्ये या फोनची किंमत ६,७०० रुपये आहे. हा फोन काळ्या आणि निळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे.

फीचर्स
‘रेडमी एवन प्लस’चे फीचर ‘रेडमी वन’ प्रमाणे आहेत. ‘रेडमी एवन प्लस’मध्ये रियर माऊंटेड फिंगरप्रिंट सेंसर हे एक्स्ट्रा फीचर देण्यात आले आहे. यामध्ये ६.५२ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्युशन १६०० × ७२० आहे. फोनची बॅटरी ५०००mAH ची आहे. फोनचा कॅमेरा ८ मेगा पिक्सल असून त्यात ०.३ डेप्थ सेन्सर आहे. यासह फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल आहे. ड्युअल सिम, ४जी, सिंगल बँड वाय-फाय आणि एक मायक्रोयुएसबी पोर्ट असे कनेक्टिव्हिटी पर्याय उपलब्ध आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या