Redmi ही एक लोकप्रिय कंपनी आहे. ही कंपनी स्मार्टफोन, टीव्ही आणि अजून अनेक उपकरणे तयार करते. नुकताच रेडमी इंडिया कंपनीने भारतात आपला नवीन टीव्ही लॉन्च केला आहे. Redmi Fire TV असे टीव्हीचे नाव आहे. Amazon च्या Fire OS सपोर्टवर डिझाइन केलेला हा कंपनीचा पहिला स्मार्ट टीव्ही आहे. Amazon इंडियाच्या वेबसाइटवर त्याच्या विक्रीसाठी एक मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसे असणार डिझाईन ?

नवीन रेडमी स्मार्ट टीव्हीमध्ये मेटॅलिक-बेझल-लेस डिझाइन आहे. तसेच स्क्रीनच्या खालच्या बाजूस फायरिंग स्पीकर आणि एअरप्ले सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. या टीव्हीवर मर्सिव्ह ऑडिओ आणि उत्तम व्हिज्युअलचा अनुभव तुम्हाला घेता येईल असे कंपनीचे म्हणणे आहे. यामध्ये ७२०p रिझोल्युशनसह HD-रेडी स्मार्ट टेलिव्हिजन आहे, ज्याद्वारे वापरकर्ते केबल टीव्हीवर HD चॅनेल पाहू शकतात. यात सेट-टॉप बॉक्स आणि गेमिंग कन्सोल कनेक्ट करण्यासाठी अनेक HDMI पोर्ट आहेत.

हेही वाचा : पोपट विकल्यानं युट्यूबरला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय? वाचा…

Redmi Fire TV मध्ये Fire OS 7 स्किन देण्यात आली आहे, जी स्मार्ट हब कंट्रोलसह येते. याच्या रिमोट कंट्रोलमध्ये गुगल असिस्टंटऐवजी अलेक्सा शॉर्टकट उपलब्ध आहे. रिमोटमध्ये नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि Amazon म्युझिक सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी वेगवेगळी बटणं आहेत. याशिवाय वापरकर्ते रेडमी स्मार्ट फायर टीव्हीवर अँड्रॉइड अ‍ॅप आणि गेम्स साइडलोड करू शकतात. टीव्हीच्या कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ब्लूटूथ 5.0 आणि ड्युअल-बँड वायफायचा समावेश आहे.

काय आहे किंमत ?

Redmi Fire TV १३,९९९ रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. २१ मार्चपासून Amazon आणि Mi.com वर खरेदी तुम्हाला है टीव्ही खरेदी करता येणार आहे. हा टीव्ही खरेदी करताना ग्राहकांना काही बँक डिस्काउंट देखील मिळू शकतो. त्यानंतर त्याची किंमत ११,९९९ रुपये इतकी होईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Redmi launch smart fire tv 32 launch in india with fire os 7and new alexa know price tmb 01
First published on: 14-03-2023 at 15:07 IST