Redmi Note 11SE स्मार्टफोन २६ ऑगस्ट रोजी भारतात लॉंच होईल. Redmi ने ट्विटरवर पोस्ट करून याची घोषणा केली आहे. आगामी Redmi फोन कंपनीच्या Redmi Note 10S चे रीब्रँडेड व्हर्जन असेल. Redmi Note 10S भारतात आधीच उपलब्ध आहे. Redmi Note 11SE साठी आता Xiaomi च्या वेबसाइटवर मायक्रो साइट बनवण्यात आली आहे. या मायक्रोसाइटवरून फोनचे स्पेसिफिकेशन्स, कलर ऑप्शन्स, डिझाईन, उपलब्धता आणि सेलची तारीख उघड झाली आहे. यासह, रेडमीच्या नवीन फोनच्या किरकोळ बॉक्सची सामग्री देखील जवळून पाहिली गेली आहे.

Redmi Note 11 SE सोबत, कंपनी USB Type-C केबल, सिम इजेक्ट टूल, प्रोटेक्टिव्ह केस, क्विक स्टार्ट गाइड, वॉरंटी कार्ड देखील देईल. याचा अर्थ कंपनी Redmi Note 11SE सह चार्जर देणार नाही.

Redmi Note 11SE sale date
Redmi Note 11SE थंडर पर्पल, कॉस्मिक व्हाइट, शॅडो ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये येतो. हँडसेट ६ GB RAM / ६४ GB स्टोरेज, ६ GB RAM / १२८ GB स्टोरेज आणि ८ GB / १२८ GB स्टोरेजमध्ये लॉंच केला जाईल. फ्लिपकार्ट आणि शाओमीच्या अधिकृत वेबसाइटवर ३१ ऑगस्टपासून रेडमी फोनची विक्री सुरू होईल.

Redmi Note 11SE च्या किंमतीबद्दल सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही. असा अंदाज आहे की हा फोन Redmi Note 10S च्या किंमतीच्या आसपास उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. Redmi Note 10S बद्दल बोलायचे झाले तर त्याच्या ६ GB RAM / ६४ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,९९९ रुपये आहे, ६ GB RAM / १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४,९९९ रुपये आणि ८ GB RAM आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६,४९८ रुपये आहे.

आणखी वाचा : BSNL ची ग्राहकांना भेट! ३२१ रुपयांमध्ये एका वर्षासाठी अनलिमिटेड कॉल, डेटा आणि बरंच काही…

Redmi Note 11SE Specifications
Redmi Note 11SE मध्ये ६.४३ इंच फुल HD + AMOLED पॅनल आहे जो २४००×१०८० पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. स्क्रीनची पिक्सेल रिझोल्यूशन ४०९ ppi आहे. स्क्रीनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio 695 प्रोसेसरसह येतो. हँडसेटमध्ये ५००० mAh बॅटरी आहे जी ३३ W चार्जिंगला सपोर्ट करते. Redmi Note 11SE मध्ये ८ GB रॅम आणि १२८ GB इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फोटोग्राफीसाठी Redmi Note 11SE मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सल प्रायमरी, ८ मेगापिक्सल अल्ट्रावाइड, २ मेगापिक्सल मॅक्रो आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन Android 11 आधारित MIUI १२.५ सह येतो. हँडसेटला IP५३ रेटिंग आहे जे पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहे. Redmi Note 11SE मध्ये ३.५ mm हेडफोन जॅक आणि IR ब्लास्टर देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी Redmi Note 11 SE मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आणि AI फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे.