रिलायन्स जिओ ही देशातील सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओने देशात सर्वांत पहिले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. आज देशातील अनेक शहरांमध्ये जिओ ग्राहक ५जी सेवेचा लाभ घेत आहेत. त्यामुळेच जिओ हे भारतातील सर्वोत्तम ५जी नेटवर्क आहे. तसेच वनप्लस एक प्रसिद्ध मोबाईल उत्पादक कंपनी आहे. कंपनी ग्राहकांसाठी टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर स्मार्टफोन्स बाजारात लाॅंच करीत असते. या दोन्ही कंपन्या ग्राहकांसाठी काहीतरी खास घेऊन येत आहेत.
चिनी मोबाईल निर्माता कंपनी वनप्लस आणि भारतातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ यांनी ५जी तंत्रज्ञान पूर्ण भारतात उपलब्ध करून देण्यासाठी पार्टनरशिप (भागीदारी) केली आहे. या पार्टनरशिपअंतर्गत दोन्ही कंपन्यांच्या नवीन आणि पायाभूत सुविधांचा एकत्रित वापर करून ग्राहकांना एक नवा अनुभव देणार आहे.
हेही वाचा…Vodafone-Idea च्या ‘या’ प्लॅन्समध्ये मिळणार एक वर्षाची मोफत मेंबरशिप; जाणून घ्या ऑफर्स…
जिओ आणि वनप्लस ५जी इनोव्हेशन लॅबची करणार स्थापना :
जिओ आणि वनप्लसच्या या भागीदारीमुळे वापरकर्त्यांना नवीन वैशिष्ट्ये आणि एक अद्वितीय ५जी नेटवर्कचा एक खास अनुभव घेता येईल. या उपक्रमांना चालना देण्यासाठी दोन्ही कंपन्या अत्याधुनिक ५जी इनोव्हेशन लॅबची स्थापना करणार आहेत. इनोव्हेशन लॅब (प्रयोगशाळा) नवीन तंत्रज्ञानाची चाचणी आणि भविष्यात विकास करण्याचे केंद्र म्हणून काम करील.
वापरकर्त्यांसाठी फायजी (5G) अनुभव खास करण्याची हीच वेळ आहे आणि म्हणूनच वन प्लसबरोबर भागीदारी करून जिओने त्या दिशेने एक पाऊल उचलते आहे . तसेच पुढील काही महिन्यांत वापरकर्ते उत्कृष्ट गेमिंग, स्ट्रीमिंग व फायजीचा उत्तम वापर अनुभवतील, असे जिओच्या प्रवक्त्याने या पार्टनरशिप बद्दल बोलताना सांगितले आहे. तसेच जिओसोबतच्या पार्टनरशिपबद्दल बोलताना वनप्लसचे प्रवक्ते म्हणाले की, आमचा जिओवरचा विश्वास या पार्टनरशिपचा एक पुरावा आहे. ही पार्टनरशिप कनेक्टिव्हिटीच्या दिशेने भविष्यात एक धाडसी पाऊल ठरेल.