scorecardresearch

Premium

रिलायन्स जिओच्या ‘या’ रिचार्ज प्लॅन्समध्ये युजर्सना मिळणार NetFlix चे सबस्क्रिप्शन, किंमत…

रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे.

reliance jio netflix basic postpaid plans
रिलायन्स जिओच्या पोस्टपेड प्लॅन्समध्ये नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन मिळते. } (Image Credit- Financial Express)

रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओने सर्वात पहिल्यांदा भारतात आपले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. २०२३ च्या अखेरपर्यंत देशातील सर्व भागांमध्ये ५ जी नेटवर्क पोहोचवण्याचे जिओचे उद्दिष्ट जिओने ठेवले आहे. जिओकडे आपल्या ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लॅन्स आहेत. ज्यामध्ये अनेक फायदे ग्राहकांना मिळत असतात. रिलायन्स जिओकडे अनेक पोस्टपेड प्लॅन्स आहेत. तथापि, कंपनीकडे असे दोन प्लॅन्स आहेत. हे प्लॅन्स जे वापरकर्ते नेटफ्लिक्ससाठी वेगळे पैसे भरतात त्यांच्यासाठी उपयुक्त आहे.

रिलायन्स जिओचे हे दोन्ही प्लॅन हे मोफत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनसह येतात. रिलायन्स जिओद्वारे ऑफर करण्यात आलेले दोन पसोटपेड प्लॅन्स हे अनुक्रमे ६९९ रुपये आणि १,४९९ रुपयांचे आहे. तर या दोन प्लॅन्सची किंमत आणि त्यात अजून कोणकोणते फायदे मिळतात ते जाणून घेउयात. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

reliance jio launch new prepaid pans with zee 5 and sony liv
ZEE5 आणि SonyLiv ओटीटी प्लॅटफॉर्मचा आनंद घ्यायचाय? रिलायन्स जिओचे ‘हे’ नवीन प्लॅन्स एकदा पाहाच
bharati airtel data vouchers 98 and 301 rs plan
एअरटेलच्या ‘या’ दोन प्लॅन्समध्ये युजर्सना मिळणार Wynk म्युझिक प्रीमियमचे मोफत सबस्क्रिप्शन
vodafone idea three plann with disney hotstar subscription
वोडाफोन आयडियाच्या ‘या’ तीन प्लॅन्समध्ये मिळते Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन आणि…., एका पाहाच
reliance jio 2545 and 2999 rs prepaid recharge plans benifits
वर्षभराचा रिचार्ज प्लॅन करायचा आहे? मग Reliance Jio ‘हे’ दोन प्लॅन्स वापरूनच पाहा, मिळतात ‘हे’ फायदे

हेही वाचा : iPhone 15 Series Sale In India: भारतात आजपासून विक्रीला सुरूवात; झटपट कॅशबॅकसह मिळणार…, फीचर्स एकदा बघाच

रिलायन्स जिओचा १,४९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

१,४९९ रुपयांचा प्लॅन हा जिओचा सर्वात महागडा पोस्टपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसचे फायदे मिळतात. या प्लॅनमध्ये एकूण ३०० जीबी डेटा मिळतो. यामध्ये नेटफ्लिक्स मोबाइलचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. तसेच Amazon प्राइम, जिओ टीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊड हे अतिरिक्त फायदे मिळतात. याशिवाय या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अमेरिका आणि इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय रोमिंग देखील मिळते.अमेरिकेमध्ये ५ जीबी हाय स्पीड डेटा आणि ५००मिनिटे इनकमिंग आणि आऊटगोइंग लोकल व भारतात कॉलबॅकचा फायदा मिळतो.

रिलायन्स जिओचा ६,९९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

रिलायन्स जिओकडे ६९९ रुपयांचा एक पोस्टपेड प्लॅन आहे. ज्यात वापरकर्त्यांना १०० जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि ३ फॅमिली सिम (प्रत्येक सिम वॉर ५जीबी डेटा मिळतो.) मिळतात. प्रत्येक अतिरिक्त सिमची किंमत महिन्याला ९९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स बेसिक, Amazon प्राइम, जिओ टीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊडचे फायदे मिळतात.

हेही वाचा : ५० मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च झाला MoTo चा ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन, किंमत आणि ऑफर्स एकदा पाहाच

जिओ पोस्टपेड प्लॅनसह नेटफ्लिक्स कसे Active करायचे?

जर का तुमच्या तुमच्या जिओ पोस्टपेड प्लॅनसह नेटफ्लिक्स अ‍ॅक्टिव्हेट करायचे असेल तर तुम्हाला MyJio App वर जावे लागेल. त्यानंतर तुमच्या रजिस्टर फोन नंबरवरून तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला अ‍ॅक्टिव्ह नेटफ्लिक्स बॅनर शोधावे लागेल. त्यानंतर तुम्ही तुमचे सध्या असलेले नेटफ्लिक्स अकाउंट लिंक करू शकता. तसेच तुमचे अकाउंट तयार करू शकता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Reliance jio netflix subscription with 1499 and 699 postpaid recharge plans tmb 01

First published on: 22-09-2023 at 11:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×