Samsung Smartphone under 8000: Samsung India ने आपला नवीन आणि सर्वात स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy A03 Core भारतीय बाजारात लॉंच केला आहे. या Budget Smartphone च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर Samsung Galaxy A03 Core हा एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये HD प्लस डिस्प्लेसह 5000 mAh ची मजबूत बॅटरी आहे. Galaxy A03 Core मध्‍ये दिलेल्‍या फीचर्स आणि किंमतीबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
Bharat Electronics Limited Trainee Engineer 517 vacancies Last Day 13 March
BEL Trainee Bharti 2024: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी इंजिनिअरच्या ५१७ पदांसाठी भरती! ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज
Indian driving license
भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह तुम्ही ‘या’ ९ देशांमध्ये बिनधास्त वाहन चालवू शकता!
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?

Samsung Galaxy A03 Core Display | सॅमसंग गॅलेक्सी ए03 कोर डिस्प्ले

Samsung Galaxy A03 Core मध्ये HD+ रिझोल्यूशनसह 6.5-इंचाचा Infinity V डिस्प्ले आहे. फोनमध्ये Unisoc SC9863A प्रोसेसर, 2 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज मिळेल, जे 1 TB पर्यंत वाढवता येऊ शकते. हा फोन अँड्रॉइड गो एडिशन सह सादर करण्यात आला आहे.

Samsung Galaxy A03 Core Software | सॅमसंग गॅलेक्सी ए03 कोर सॉफ्टवेअर

सॉफ्टवेअर: Samsung Galaxy A03 Core स्मार्टफोन Android 11 (Go Edition) वर काम करतो.

Samsung Galaxy A03 Core Processor | सॅमसंग गॅलेक्सी ए03 कोर प्रोसेसर

वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, 2GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह Unisock SC9836A ऑक्टा-कोर प्रोसेसर, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1TB पर्यंत वाढवणे शक्य आहे.

Samsung Galaxy A03 Core Camera | सॅमसंग गॅलेक्सी ए03 कोर कॅमेरा

Galaxy A03 Core मध्ये सिंगल रियर आणि सिंगल फ्रंट कॅमेरा आहे. Galaxy A03 Core मध्ये f/2.0 च्या अपर्चरसह 8-मेगापिक्सेलचा मागील कॅमेरा आहे. समोर 5 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. मागील कॅमेरासोबत फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

Samsung Galaxy A03 Core Battery | सॅमसंग गॅलेक्सी ए03 कोर बॅटरी

सॅमसंगच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. फोनसोबत फास्ट चार्जिंग देण्यात आलेली नाही. कनेक्टिव्हिटीसाठी, यात 4G LTE, सिंगल बँड Wi-Fi 802.11 b/g/n, Wi-Fi डायरेक्ट, ब्लूटूथ v4.2, 3.5mm हेडफोन जॅक, GPS, चार्जिंग पोर्ट आणि ग्लोनास आहे.

Samsung Galaxy A03 Core Connectivity | सॅमसंग गॅलेक्सी ए03 कोर कनेक्टिव्हिटी

फोनमध्ये वाय-फाय, 4जी एलटीई, वाय-फाय डायरेक्ट, जीपीएस, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि ब्लूटूथ आवृत्ती 4.2 यासह अनेक वैशिष्ट्ये प्रदान करण्यात आली आहेत.

Samsung Galaxy A03 Core Price in India | सॅमसंग गॅलेक्सी ए03 कोर किंमत

Galaxy A03 Core या नवीन फोनची किंमत ७,९९९ इतकी किंमत ठेवण्यात आली आहे. ब्लू आणि ब्लॅक अशा दोन्ही कलर व्हेरिएंटमध्ये हा फोन उपलब्ध आहे. Galaxy A03 Core एकाच व्हेरिएटंमध्ये लॉंच करण्यात आलाय, ज्यात 2 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज आहे. सॅमसंग इंडियाच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअर व्यतिरिक्त हा हँडसेट प्रमुख ऑफलाइन स्टोरमधून खरेदी करू शकता.