Samsung Galaxy F04 हा नवीन स्मार्टफोन कंपनीने लाँच केला असून, आजपासून त्याची भारतात विक्री सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन सॅमसंग ऑनलाईन स्टोअरवर खरेदी करता येणार आहे. तसेच दुपारी १२ वाजल्यापासून हा फोन फ्लिपकार्टवर देखील विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. याचे लाँचिंग महिन्याभरापूर्वी केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सॅमसंग गॅलॅक्सी एफ०४ या फोनचे रिझोल्युशन ७२०x१५६० इतके आहे. याचा डिस्प्ले ६.५ इंचाचा असून एचडी डिस्प्ले आहे. MediaTek Helio P35 ऑक्टा-कोर प्रोसेसर ४ जीबी रॅमसह जोडलेले आहे .हे मायक्रोएसडी कार्ड स्लॉटसह येते ज्याचा वापर करून स्टोरेज १ टीबीपर्यंत वाढवता येते. याला १३ मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा येतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. याफोनची बॅटरी ५०००mAh क्षमतेची असून याला १५ वॅट चा फास्ट चार्जिंग सपोर्ट येतात.दरम्यान, सॅमसंग फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आपली Galaxy S23 सिरीज आणणार ही अफवा आहे. आगामी स्मार्टफोन्स हे २०० मेगापिक्सल कॅमेरा , सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी आणि अन्य फीचर्ससह येण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा : टाटा समूह भारतात उघडणार Apple चे १०० एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स

Samsung Galaxy F04 स्मार्टफोनची किंमत आणि ऑफर्स

हा स्मार्टफोन एकाच प्रकारात येतो. यामध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज येते. त्याची किंमत ही ९,४९९ रुपये इतकी आहे. पण ऑफरमध्ये आज हा हँडसेट ८,४९९ रुपयांना सवलतीच्या दरात ग्राहकांना उपल्बध होणार आहे. याशिवाय खरेदीदारांना या फोनची खरेदी आयसीआयसीआय बॅंकेच्यक क्रेडिट कार्डने केल्यास १००० रुपयांची सूट मिळणार आहे. हा स्मार्टफोन ओपल ग्रीन (Opal Green)आणि जेड पर्पल(Jade Purple) या दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung galaxy fo4 to go on sale inindia from today price and features tmb 01
First published on: 12-01-2023 at 10:11 IST