Samsung Galaxy M सीरिजचा नवीन फोन Samsung Galaxy M33 5G भारतात लॉन्चिंग कन्फर्म झालं आहे. Samsung Galaxy M33 5G भारतात २ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता लॉन्च होईल आणि हा फोन Amazon India वरून विकला जाईल. फोनसाठी मायक्रो साइट देखील Amazon वर लाइव्ह झाली आहे. Samsung Galaxy M33 5G ला 5nm ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळेल. याशिवाय, फोनला 25W चार्जिंग सपोर्टसह मोठी 6000mAh बॅटरी मिळेल.

Samsung Galaxy M33 5G च्या फिचर्सबद्दल बोलायचं झाल्यास, यात 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा LCD डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये चार रियर कॅमेरे मिळतील, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेल असेल. हा फोन 6GB + 128GB आणि 8GB + 128GB दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केला जाईल. अॅमेझॉनवरही नोटिफिकेशन ऑप्शन येत आहे.

New Era of Tv Samsung launch the world first glare free OLED Two TV with powerful AI features
AI फीचर्ससह सॅमसंगचे ‘हे’ दोन टीव्ही भारतात लाँच; सेटअप बॉक्स लावण्याचीही गरज नाही; किंमत फक्त…
a cloth seller told foreigner how to sell clothes funny video goes viral
“एकसो पचास मे दो….” कापड विक्रेत्याने फॉरेनरला शिकवले की कपडे कसे विकायचे…
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
world's first self-driven electric
एप्रिल फुल नव्हे, खरचं चालकाशिवाय धावतेय ही दुचाकी! भाविश अग्रवालने केली Ola Soloची घोषणा, पाहा Video

आणखी वाचा : Apple iPhone 13 मिळतेय २८ हजार रुपयांपर्यंत सूट, जाणून घ्या ऑफर आणि किंमत

Galaxy M33 5G ला 8-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळेल. इतर फिचर्सबद्दल बोलायचं झाल्यास, Samsung Galaxy M33 5G ला एक साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळेल. याशिवाय फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक असेल. या फोनसह बॉक्समध्ये चार्जर देखील अपेक्षित नाही.

आणखी वाचा : Samsung Galaxy M33 5G लवकरच भारतात लॉन्च होणार, Amazon India वर टीझर रिलीज, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

सॅमसंगने अलीकडेच भारतात Samsung Galaxy A53 5G लॉन्च केला आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. याशिवाय कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे. या सॅमसंग फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले आहे. याशिवाय Galaxy A53 5G मध्ये 8 GB रॅम आणि 5 नॅनोमीटर Exynos 1280 प्रोसेसर देण्यात आला आहे. Samsung Galaxy A53 5G ची सुरुवातीची किंमत ३४,४९९ रुपये आहे.