Apple ने भारतीय बाजारपेठेत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. लोकांमध्ये आयफोन घेण्याची क्रेझ आहे. तुम्हालाही आयफोन खरेदी करायचा असेल, पण तुमच्याकडे तेवढे बजेट नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्हाला गेल्या वर्षी लॉन्च झालेला iPhone 13 मोठ्या सवलतीत खरेदी करण्याची संधी आहे. यावर २८ हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात असून तुम्ही Amazon च्या वेबसाइटवरून खरेदी करू शकता.




Apple iPhone 13 ची किंमत आणि ऑफर
निळ्या रंगातील व्हॅनिला आयफोन १३ चा बेस व्हेरिएंट सध्या Amazon वर ७३,९०० रुपयांना उपलब्ध आहे, तर त्याच्या स्टिकरची किंमत ७९,९०० रुपये आहे. डिस्काउंट ऑफरबद्दल बोलायचे झाले तर यावर १६,२०० रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफर दिल्या जात आहेत.
यासह, ICICI बँक, SBI किंवा कोटक बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास ६००० रुपयांची त्वरित सूट दिली जात आहे. म्हणजेच, iPhone 13 च्या स्टिकरच्या किमतीवर २८,२०० रुपयांच्या सवलतीसह ५१,७०० रुपयांना खरेदी करता येईल.
आणखी वाचा : UPI आणि नेट बँकिंगचा वापर करताय?, मग पासवर्ड बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा
Apple iPhone 13 स्पेसिफिकेशन
iPhone 13 गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च झाला होता. स्मार्टफोन 6.1-इंचाच्या सुपर रेटिना XDR डिस्प्लेसह येतो. हे 12-मेगापिक्सेल ड्युअल-कॅमेरा सेटअपसह येते जे सिनेमॅटिक मोड देते. iPhone 13 मध्ये 12-megapixel TrueDepth फ्रंट कॅमेरा देखील आहे.
हा स्मार्टफोन Apple च्या A15 बायोनिक चिपद्वारे समर्थित आहे. भारतात iPhone 13 ची किंमत 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी ७९,९०० रुपये, 256GB व्हेरिएंटसाठी ८९,९०० रुपये आणि iPhone 13 च्या टॉप-स्पेक 512GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी रुपये १,०९,९०० आहे.